💥हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे मंगलमूर्ती मोरया फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चा भव्य शुभारंभ संपन्न...!

💥माजी सहकार राज्य मंत्री तथा साखर संघांचे राष्टीय अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती💥 

हिंगोली ; जिल्ह्यातील वसमत येथील नवा  मोढा येथे दि.10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी च्या शुभ मूहुर्तावर मंगलमूर्ती मोरया फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चा शुभारंभ आणि उदघाटन सोहळा माजी सहकार राज्य मंत्री तथा साखर संघांचे राष्टीय अध्यक्ष श्री जयप्रकाश दांडेगावकर तसेच वसमत विधानसभेचे आमदार राजुभैय्या नवघरे , कृषी उत्पन्न बाजार समीती मुख्य प्रशासक श्री तानाजी बेंडे पाटिल यांच्या उपस्थितीत पार पडला.        ‌.            या शुभारंभाला गोरख पाटिल, सोपान शिंदे, जिजामामा हरणे, बालासाहेब महागावकर, उमाकांत शिंदे, त्र्यंबक कदम, प्रशांत शिंदे, विनोद झवर, प्रल्हादराव बोरगड, बि.डी.कदम, दौलत हुंबाड, जगताप, या सर्व माण्यवरांची उपस्थिती होती.

            माण्यवरांनी रिबीन कापुन आणि लक्ष्मी आणि गणपती च्या प्रतिमेचे पुजन करून या मंगलमूर्ती मोरया कंपनीला शुभेच्छा दिल्या. या वेळी *मंगलमूर्ती मोरया कंपनीचे संचालक भागवतराव शिंदे, उध्दवराव शिंदे, शरद देशमुख, गोविंदराव हंबंर्डे, देवगिर गिरी, सोनाजी भुसागरे,भास्कर कदम* यांनी सर्व माण्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


         शेती माल खरेदी ,विक्री आणि प्रक्रिया उदयोग करून या मंगलमूर्ती मोरया कंपनीची भरभराट होऊन या कंपनीने शेतकऱ्याचे हित जोपासावे , असे आपल्या मनोगतात जयप्रकाश दांडेगावकर साहेब आणि आमदार राजुभैय्या नवघरे यांनी व्यक्त करून मंगलमूर्ती मोरया कंपनीला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

            या प्रसंगी शेतकरी बंधु, प्रतिष्ठीत व्यापारी, नागरीक उपस्थित होते. चहा आणि अल्प उपहार करून हा सोहळा संपन्न झाला.  !!!!!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या