💥पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त जवान व शेतकऱ्यांचा सन्मान...!


💥पुर्णा तालुका भाजपा किसान मोर्चाच्या वतीने आयोजन ,  तालुक्यातील शेतकऱ्यांनी साधला एकत्र संवाद💥

पुर्णा ; तालुक्यातील धानोरा काळे येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवसानिमित "जवान व किसान" यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन भाजपा किसान मोर्चा पूर्णा च्या वतीने  करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून यशस्वी करत मोठे योगदान दिले आशा शेतकऱ्यांचा व जवान सदाशिव काळे यांचे वडील उद्धवराव काळे यांचा भाजपा  जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन यावेळी  सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमात डॉ.सुभाष कदम यांनी पंतप्रधान पीक विमा योजना,केंद्र सरकारच्या विविध योजना विषयी सविस्तर माहिती दिली तसेच भाजपा सरकारच्या काळात सुरू केलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना किती फायदेशीर आहे याविषयी माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

              यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच कैलास काळे तर प्रमुख उपस्थिती प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा बळीराम कदम,जिल्हा उपाध्यक्ष बालाजी रुद्रावार,माधवराव चव्हाण,सुधाकर भोसले,माधव दुधाटे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष प्रताप काळे,वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश गिणगिणे यांची उपस्थित होती. या कार्यक्रमात आपल्या शेतीत विविध प्रयोग करून योगदान देत यशस्वी वाटचाल केलेले शेतकरी श्रीधर सोलव (मोत्याची शेती ), सुदाम आबा दुधाटे (सोयाबीन लागवड),मधुकरराव जोगदंड(रेशीम शेती,फळबाग),कृष्णा काळे( विविध उत्तपादनांची पॅकिंग व विक्री),माधव काळबांडे(नवनवीन प्रयोग),दामोधर रेनगडे (पेरू, मत्स्य शेती),रामराव बोबडे(शेततळे,फळबाग),कैलास देसाई(नवनवीन प्रयोग),सुनील देसाई(फळबाग),मोतीराम पौळ (रेशीम शेती),भगवान शिंदे(फुलशेती),मोतीराम दुधाटे (रेशीम)बंडू पांचाळ,दत्तराव पौल (भाजीपाला) या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला,कोरोणा काळात चांगली सेवा दिल्याबद्दल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश गिणगिणे, तसेच उत्तराखंड सीमेवर सेवा बजावत असलेले जवान सदाशिव काळे यांचे वडील उद्धवराव काळे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला या कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी उपस्थित होते .सूत्रसंचालन प्रताप काळे यांनी केले तर आभार जनक काळे यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या