💥श्रीराम मंदिराचे पुजनसेवासाधक श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांचे दुःखदा निधन....!


💥त्यांच्या पार्थिवावर उखळी (बु.) येथे बुधवार दि.22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - श्रीराम मंदिराचे पुजनसेवासाधक तथा उखळी बु.येथील  प्रतिष्ठीत व परिसरातील सर्वपरिचित व्यक्तीमत्व श्री. भास्करराव नरहरराव जोशी (उखळीकर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 72 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पार्थिवावर उखळी (बु.) येथे  बुधवार दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

         श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) हे अतिशय धार्मिक, मनमिळाऊ, संयमी व कुटुंबवत्सल म्हणून परिचित होते. सर्वदूर परिचय, धार्मिक, पौरोहित्य क्षेत्रात जीवनभर कार्यरत होते.त्यांचा दांडगा जनसंपर्क होता.जोशी (उखळीकर) परिवाराचा आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे. परभणी समाज कल्याण विभागाचे निरीक्षक दिनकरराव जोशी, पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते हभप बाळु (सुरेंद्र) महाराज उखळीकर यांचे ते वडील होत. गेल्या पंधरा दिवसांपासून लातुर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने धार्मिक, सांस्कृतीक, विविध स्तरातुन शोकभावना व्यक्त होत आहेत.

दरम्यान,श्री.भास्करराव जोशी (उखळीकर) यांच्या पार्थिवावर मुळगावी उखळी (बु.) येथे उद्या बुधवार दि. 22 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या