💥गावभेटीत भेटीदरम्यान त्यांनी इ- पिक पाहणीमध्ये जास्तीत जास्त शेतकर्यांनी आपला सहभाग नोंदवावा याविषयी मार्गदर्शन केले💥
फुलचंद भगत
मंगरूळपीर- तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथे तहसीलदार नरसय्या कोंडागुरले यांनी आज इ पीक पहाणी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी इ पिक पाहणीमध्ये जास्तीत जास्त शेतकर्यांनी आपला सहभाग नोंदवावा याविषयी मार्गदर्शन केले.
राज्य शासनाच्या धोरणानूसार राज्यातील शेतकऱ्यांच्या शेत शिवारा मधील खरीप आणि आणि रब्बी हंगामामध्ये कुठल्या धान्यांंचा पेरा केलेला आहे हे नोंदविण्यासाठी महसूल विभागातील तलाठ्यांना प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात शिवारामध्ये जाऊन पिकाची पाहणी करून त्याची नोंदणी सातबारावर करावी लागत होती. मात्र आता अद्ययावत अशा ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक्स (ई) पेरणी संदर्भातील माहिती आपल्या मोबाईल द्वारे शेतकरी भरू शकतो. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मंडळ अधिकारी लोखंडे, मंडळातील तलाठी इंगोले आणि सावरगाव कान्होबाचे तलाठी अमर शिंदे यांच्यासमवेत तहसीलदारांनी गावातील शेतकऱ्यांना आज मार्गदर्शन केले गेले.राज्यातील महसूल आणि कृषी विभागातील विविध योजना आता ऑनलाइन होत असून पूर्वीप्रमाणे कृषी सहाय्यक अथवा साजातील तलाठी कडे जाऊन सातबारा, फेरफार, आठ अ वा इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी शेत शिवारातील कामधंदे सोडून पायपीट करण्याची पाळी शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी तथा प्रशासकीय कारभार सुटसुटीत व्हावा हा हेतू सुद्धा ई पिक पाहनी अभियानात समाविष्ट आहे.सावरगाव कान्होबा येथील तब्बल 65 टक्केच्या जवळपास शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या अँड्रॉइड भ्रमणध्वनीद्वारे या वर्षीच्या शेतातील पेरणी ची माहिती भरलेली आहे.सावरगाव कान्होबा येथील ई पिक पेरणी संदर्भातील शेतकऱ्यांच्या सहकार्य बाबत तहसीलदार कोंडागुरले यांनी समाधान व्यक्त केले. सावरगाव कान्होबाचे तलाठी अमर शिंदे यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी ई पिक पेरनी संदर्भातील माहिती ऑनलाईन भरण्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या