💥गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्यास रेल्वेची परवानगी💥
✍ मोहन चौकेकर
▪पाकिस्तानच्या रावळपिंडीत पाकिस्तानी लष्कराचं विमान कोसळलं, पाच सैनिकांसह 15 जणांना मृत्यू
▪काँग्रेस अध्यक्षपदी प्रियंका गांधींची वर्णी लागण्याची शक्यता, राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर दोन महिन्यांपासून काँग्रेस पक्ष अध्यक्षाविना
▪तिहेरी तलाकची आज राज्यसभेत परीक्षा, भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्यानं अडचण, राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे लक्ष
▪नारायण राणेंच्या आत्मचरित्राला शरद पवारांची प्रस्तावना, प्रकाशनालाही पवारांची प्रमुख उपस्थिती, मुख्यमंत्र्यांकडून अद्याप वेळ नाही
▪कर्नाटकातील राजकीय नाट्य संपलं, येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध केलं, सरकारला 106 आमदारांचा पाठिंबा
▪ गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्यास रेल्वेची परवानगी, अमित ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश
▪ राजकीय भूकंपासाठी भाजपने उद्याचा मुहूर्त निवडला, नवी मुंबईतील नाईक कुटुंबियांसह शिवेंद्रराजे, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर भाजपात जाणार, सूत्रांची माहिती
▪मुंबईत राज ठाकरे, अजित पवार, राजू शेट्टी आणि जयंत पाटलांची गुफ्तगू, ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणी, 9 ऑगस्टला मनसे रस्त्यावर उतरणार
▪ठाण्यातील कळवा परिसरात डोंगराचा काही भाग घरांवर कोसळला, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, एक महिला गंभीर
▪महापौर निधीतून मुंबईकरांना मदतीचा हात, गरजू रुग्णांना 25 हजारांपर्यंत मदत मिळणार, नगरसेवक एका महिन्याचे मानधन महापौर निधीला देणार
▪पावसाच्या नॉनस्टॉप बॅटिंगमुळे मुंबईसह राज्यातील धरणांमध्ये खळखळाट, गंगापूरमधून जायकवाडीच्या दिशेनं विसर्ग, गोदावरीसह अनेक नद्यांना पूर
▪कोकण आणि विदर्भातही मुसळधार पाऊस, सिंधुदुर्गात काही गावांचा संपर्क तुटला तर गडचिरोलीच्या पार्लकोटा नदीलाही पूर
▪भारतीय संघात मतभेद असल्याच्या बातम्यांचं विराट कोहलीकडून खंडन, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी भारतीय कर्णधाराची पुन्हा रवी शास्त्रींनाच पसंती
▪बुलडाण्याच्या अनंता चोपडेला इंडोनेशियातील प्रेसिडेंट कप बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक, 52 किलो गटात अफगाणिस्तानच्या रेहमानी रमीशचा केला पराभव
✍ मोहन चौकेकर

0 Comments