💥वाट्सअप ग्रुप हुजूरी क्रांती संघटन या ग्रुप वर सामुहीक चाटींग केल्या प्रकरणी ४ जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता💥
नांदेड/व्हॉट्सअॅप वर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची बदनामी केल्याचा आरोपातून जिल्हा व सत्र न्यायालयाने जगदीपसिंघ नंबरदारसह चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधिश सतीश बी. हिवाले यांनी दि. 16 जुलै रोजी एका आदेशाद्वारे चौघांना निर्दोष असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर आरोपीची मानसिक छळातून देखील मुक्तता झाली आहे.
दि. 12 फेबु्रवारी 2015 रोजी शीख समाजातील व्हॉट्सअॅप गु्रप हजुरी क्रांती संघटनामध्ये सामुहिक चॅटींग (संवाद) मध्ये गुरुद्वारा बोर्ड सदस्य आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बदनामी झाल्याची तक्रार तत्कालीन गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सदस्य व सध्याचे बोर्ड सचिव स. रविंद्रसिंघ आशासिंंघ बुंगाई यांनी वजीराबाद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर वजिराबाद पोलिसांनी लख्विंदरसिंघ लख्खी, पुरुषोत्तमसिंघ लक्कीसिंघ चुग, जगदीपसिंध नंबरदार आणि जगदीपसिंघ चव्हाण, सर्व रा. नांदेड यांच्या विरुद्ध गुन्हा क्रं. 13/2015 भादवि 294,34 आणि आय. टी. अॅक्ट 66 ए प्रमाणे गुन्हा दाखल केला. वरील प्रकरणी वर्षे 2016 पासून जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे प्रकरण सुरु होते. न्यायालयाने दोन साक्षीदार आणि दोन पंचाचे म्हणने ऐकुण घेतले. न्यायाधिश सतीश बी. हिवाले यांनी वरील प्रकरणात रविंद्रसिंघ बुंगाई यांनी केलेल्या आरोपांना निराधार मानून चौघांची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या नंबरदार यांच्यावतीने अॅड. मिलिंद एकताटे यांनी हे काम पाहिले व त्यांना अॅड. मोहनदास जहागीदार यांनी सहकार्य केले व तीघा आरोपींच्या वतीने अॅड. आर. जी. परळकर यांनी कोर्टासमोर बाजू मांडली व त्यांना अॅड. मोहन बंठे, अॅड. अमनपालसिंघ कामठेकर यांनी सहकार्य केले...

0 Comments