💥हैद्राबादेतील खाजगी रुग्नालयात उपचारा दरम्यान आज दि.२१ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली💥
परभणी/जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे निर्भिड व जनहीतवादी जिल्हा प्रतिनिधी असलेले परभणी येथील पत्रकार सलीम इस्माईल शेख यांचे आज रविवारी दुपारी निधन झाले. मृत्यू समयी ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात १ मुलगा,३ मुली,पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना हैद्राबादला हलविण्यात आले होते.पण उपचारास शरीराकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पत्रकार सलीम शेख यांच्या अचानक निधनाने परभणी जिल्ह्यासह राज्यातील त्यांच्या पत्रकार मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे...

0 Comments