🌟विधान परिषदेतील निवृत्त होणाऱ्या सदस्यांची वरिष्ठ सभागृहाचा नावलौकिक उंचावणारी कामगिरी पुढील पिढ्यांना प्रेरणादायी...!


🌟महाराष्ट्र विधान परिषदेतील निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार🌟 

🌟परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी विधान परिषदेतून निवृत्त🌟


मुंबई (दि.४ जुलै २०२४) :- महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थाने सभागृह वरिष्ठ आहे. त्याचा नावलौकीक उंचावणारी कामगिरीच आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी केली आहे. या कामगिरीची दखल विधिमंडळाच्या कामकाजाच्या रुपाने इतिहास म्हणून नोंदवली गेलीय. येणाऱ्या पिढ्यांना या मंडळीचे काम या कामकाजाच्या नोंदीवरून अभ्यासता येईल. त्यातून प्रेरणा घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांना आज निरोप देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते विधान परिषदेतील विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल  पाटील, अॅड. अनिल परब, महादेव जानकर, डॉ. मनिषा कायंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. मिर्झा वजाहत, डॉ. प्रज्ञा सातव, जयंत पाटील या सदस्यांना निरोप देण्यात आला. 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राचे हे वरिष्ठ सभागृह वैशिष्ट्यपूर्ण असून देशात सहा राज्यातच हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाकडे आदरानं पाहिलं जातं. या देशाला संसदीय कार्य प्रणालीचा आदर्श घालून देणारी व्यक्तिमत्वं अनेक दिग्गज, विद्वान या सभागृहाचे सदस्य होऊन गेले आहेत. या सभागृहातूनच महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत महत्वाचे असे कायदे केले गेले आहेत. आज निवृत्त होणाऱ्या सदस्यांनी या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्याचे काम केले आहे. राज्याच्या वरीष्ठ सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करुन जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम या सर्व सदस्यांनी केले. आपल्या कामातून या सर्वांनी वरीष्ठ सभागृहाचा लौकिक वाढवला असून जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे, असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच यावेळी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना पुढील वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या......

०००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या