🌟परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज केला दाखल....!


🌟राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री धनंजय मुंडे व पालकमंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती🌟

परभणी (दि.०२ जुलै २०२४) : परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी आज मंगळवार दि.०२ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे व पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

          विधानपरिषदेच्या ११ रिक्त जागांकरीता निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली असून त्या निवडणूकीकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे विटेकर यांनी सर्व कागदपत्रांची जूळवाजूळव करीत आज मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री पवार, कृषिमंत्री मुंडे, पालकमंत्री बनसोडे, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या