🌟मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथे विविध शासकीय योजनांची जञा ; लाभ घेण्याचे आ.लखन मलिक यांचे आवाहन....!


🌟आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत आ.लखन मलिक देताय जनसामान्यांना जनहीतवादी शासकीय योजनांची माहिती🌟


✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- आमदार लखन मलिक यांच्या स्वयः प्रेरणेतुन मंगरुळपीर तालुक्यातील मौजे पारवा, बोरव्हा (बु. ), लख्मापूर येथे सर्व नागरिकांकरिता दि. 7 जुलै 2024 रोज रविवारला सकाळी ठीक 11 ते 5 वाजेपर्यंत आ.लखन मलिक यांच्या अध्यक्षते्खाली व तसेच तहसीलदार मंगरूळपीर व सरपंच उपसरपंच व सर्व ग्रा. प. सदस्य, सदस्या गट ग्रामपंचायत पारवा, बोरव्हा (बु), लखमापूर येथे यांच्या संयुक्त माध्यमातून शासकीय विविध योज़नेचा लाभ लाभार्थ्यापर्यत पोहचविण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन केलेले आहे.गट ग्रामपंचायत पारवा, बोरव्हा (बु.), लखमापूर येथील सर्व पात्र नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.लखन मलिक यांनी केले आहे.

         जनतेचे जीवनस्तर तसेच आर्थीक स्तर ऊंचावण्यासाठी शासनस्तरावरुन विविध कल्याणकारी योजना वेळोवेळी राबवल्या जातात.या योजनेच्या माध्यमातुन पाञ लाभार्थ्यांना मोठा आधार मिळतो.पण बहूतांश योजना लोकापर्यत पोहचत नाहीत किंवा यंञणांना पाञ लाभार्थ्यांचे कागदपञे घेवुन योजनेचा लाभ देण्याची यंञणा कधी कमी पडते त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची 'जञा' गावातच किंवा सर्कलमध्ये भरावी अशी अभिनव संकल्पना पारवा गटग्रामपंचायतने राबवण्याचा संकल्प केला आहे.या अनुषंगाने मंगरुळपीर वाशिमचे आमदार लखन मलिक यांच्या हस्ते आणी तहसिलदार शितल बंडगर यांच्या ऊपस्थीतीत विविध 'शासकीय योजना आपल्या दारी' ही संकल्पना दि.7 जुलै रोजी मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथे राबविल्या जाणार आहे.या ऊपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.लखन मलिक आणी सरपंच गोपाल लुंगे यांनी केले आहे.

* 'योजना आपल्या दारी'मधील विविध योजना :-

1)मा. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना.

2.) नवीन राशन कार्ड करणे.

3.) राशन कार्ड वेगळे करण्याकरिता

4.) राशन काई दुरुस्ती करणे.

5.) राशन कार्डची दुव्यम प्रत मिळवण्याकरिता

7.) मा. प्रधानमंत्री सन्मान निधी योजना

(मोदी योजनेचे 2000 हजार मिळण्या करिता)

৪.) संजय गांधी निराधार योजना.

6.) राशन काड मधून नाव कमी करणे किवा दुरुस्त करणे.

9.) श्रावण बाळ योजना

10.) मा. प्रधानमंत्री पीकविमा योजना

✍🏻प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या