🌟वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील दिवाणी न्यायालयास पर्यायी जागेसाठी विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांचा दौरा...!


🌟संयुक्तरित्या स्थळ पाहणी करुन समन्वयाने निर्णय घ्यावा,असे विभागीय आयुक्त डॉ.पाण्डेय यांनी पाहणी दरम्यान सांगितले🌟


फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीसाठी जागेबाबतचा विभागीय आयुक्त डॉ निधी पाण्डेय यांनी न्यायालयाच्या पर्यायी जागेची पाहणी आज दि.१० जुलै रोजी केली. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपायुक्त श्यामकांत म्हस्के, जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीष हांडे, उपजिल्हाधिकारी महसूल विरेंद्र जाधव व संबंधित कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

                राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलच्या (एनडीआरएफ) अधिनियमानुसार धोक्याच्या ईमारतींची मान्सुनपूर्व पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले. त्यानुसार मालेगावच्या दिवाणी न्यायालयाच्या सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या ईमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन ईमारत वापरण्यायोग्य आहे किंवा कसे त्यासंबंधीचा अहवाल सादर करावा.असे निर्देश दि.९ जुलै रोजी झालेल्या अमरावती येथील आढावा बैठकीत देऊन न्यायालयासाठी पर्यायी जागा किंवा इमारत याचा शोध घेऊन त्याबाबत न्यायालय प्रशासनास कळवावे.असे निर्देश त्यांनी दिले होते. न्यायालयासाठी जागा किंवा ईमारत निश्चितीची प्रक्रिया करीत असताना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, न्यायालयाचे प्रशासकीय अधिकारी आदींनी संयुक्तरित्या स्थळ पाहणी करुन समन्वयाने निर्णय घ्यावा, असे विभागीय आयुक्त डॉ .पाण्डेय यांनी पाहणी दरम्यान सांगितले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या