🌟परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मनी यांची अकरा लाख रुपयांना फसवणूक...!


🌟 या ऑनलाइन फसवणूकीच्या घटने संदर्भात नवा मोंढा पोलीस स्थानकात अज्ञात भामट्या विरोधात तक्रार दाखल🌟

परभणी : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मनी यांना एका अज्ञात भामट्याने चक्क मोबाईलद्वारे बँक खात्याच्या माहितीसह ओटीपी मागून त्यांच्या खात्यातील तब्बल १० लाख ९९ हजार रुपयांची रक्कम पळवल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांमध्ये अक्षरशः खळबळजनक माजली आहे.

 या ऑनलाइन फसवणूकीच्या घटने संदर्भात नवा मोंढा पोलीस स्थानकात कुलगुरू डॉ.इंद्र मनी यांनी स्वतःच्या झालेल्या फसवणुकी संदर्भात तक्रार दाखल केली असून त्याद्वारे एका भामट्याने मोबाईल द्वारे आपणास केलेले मेसेज,मोबाईल व त्यास तो बँकेचा प्रतिनिधी असावा असे समजून दिलेला प्रतिसाद याची माहिती देवून संबंधित भामट्याने खात्यातून काढलेल्या दहा लाख 99 हजार रुपयांचा प्रकार निदर्शनास आणून दिला.

 दिल्ली येथील बँक अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यानंतर आपण फसलो आहोत हे लक्षात आल्याचेही कुलगुरू डॉक्टर मनी यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान या प्रकरणात मोंढा ठाण्यातील अधिकारी तपास करीत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या