🌟परभणी येथील जवाहर नवोदय विद्यालयात खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगीड यांच्या हस्तें वृक्षारोपण.....!


🌟यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी सचिन कवठे हे विशेष अतिथी उपस्थित🌟


परभणी (दि.04 जुलै 2024) : सार्वत्रिक निवडणूक-2024 परभणी लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक डॉ.दिनेशकुमार जांगीड यांनी परभणी येथील जवाहर नवोदय विद्यालयात 11 रोपे लावून यंदाच्या वृक्षारोपण करून वन महोत्सवाची सुरुवात केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी सचिन कवठे हे विशेष अतिथी तसेच मुख्याध्यापक सदाशिव बोभाटे उपस्थित होते डॉ.दिनेशकुमार जांगीड हे सध्या नवी दिल्ली येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि ते जवाहर नवोदय विद्यालय, नागौरचे माजी विद्यार्थी असल्याचे मुख्याध्यापक श्री. बोभाटे यांनी सांगितले. डॉ. जांगीड यांनी आज नवोदय विद्यालयाच्या प्रार्थना सभेत सहभागी होऊन ध्वजारोहण केले. त्यानंतर डॉ. जांगीड यांनी मुलांना प्रेरणादायी भाषण केले व आपल्या भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी अजूनही वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, जेणेकरून त्यावेळी आपण जास्त मेहनत करू शकलो असतो, याची नंतर कधीही खंत वाटू नये. कठोर परिश्रम करून उज्ज्वल भविष्याचा पाया आत्ताच मजबूत करण्याबाबत डॉ. जांगीड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.  

जवाहर नवोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी डॉ. जांगीड व जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा पुष्पगुच्छ व शाल देवून सत्कार केला. त्यानंतर शाळेच्या आवारातच निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. जांगीड यांच्या हस्ते विविध प्रकारची 11 रोपे लावण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते नवोदय विद्यालयाच्या ई-डिस्प्ले बोर्डाचे बटन दाबून उद्घाटनही करण्यात आले......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या