🌟परभणीत लायन्स क्लब प्रिन्स व गुरुमाऊली आयुर्वेद यांच्यावतीने मोफत वृक्ष पेढी (ट्री बँक)चे लोकार्पण....!


🌟सदरील कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री संतोष अंधारे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी :- परभणी शहरातील जामकर कॉम्प्लेक्स मधील गुरुमाऊली आयुर्वेद येथे आज रविवार दि.०७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता मोफत वृक्ष वाटप व वृक्ष बँकेचे उद्घाटन करण्यात आले.


सदरील कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री संतोष अंधारे,लॉयन्स क्लब प्रिन्स चे अध्यक्ष उल्हास नावेकर,लायन्स क्लब मेनचे अध्यक्ष अवि टाक, कॅबिनेट ऑफिसर डॉक्टर प्रवीण धाडवे,गुरुमाऊली आयुर्वेद चे डॉ. संदीप चव्हाण , ला. संतोष नारवणी, ला मनोहर चौधरी, ला महेश बासटवार, ला सचिन सरदेशपांडे, ला डॉ सुनील मोडक, ला प्रा सुरेश खिस्ते, ला मयुर भाले,कृषी विभाग आत्मा प्रकल्पाचे संचालक श्री चव्हाण, जनार्दन आवररगंड ला विकास एस्के, ला.बायस, ला.कृष्णा कदम,सुनील कोरडे, डॉ.ईश्वर दुधाटे ,विकास साळवे,आकाश बोरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या वृक्ष पेढीच्या माध्यमातून 1000 वृक्ष वाटपाचा मानस ला डॉ संदीप चव्हाण यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या