🌟कंत्राटी कामगार पगार वाढीपासुन वंचित शासनाचे दुर्लक्ष - विक्की कावळे


🌟तांत्रिक ॲप्रेंटीस,कंत्राटी कामगार असोसिएशनच्या आरोप🌟

नागपूर :- महावितरण,महापारेषण, महानिर्मिती कंपनी मध्ये ४२ हजाराच्या वर कंत्राटी कामगार आहेत.  कंत्राटी कामगार हा वीज निर्मिती पाहून वीज वहण तसेच वीज वितरणाचे काम कायम कामगारांप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत करीत आहे.  कंत्राटी कामगारांनी कोरोना काळा मध्ये जनतेची सेवा करताना प्राणाची आहुती दिली आहे. दर दिवशी कंपनीची सेवा बजावत असताना काही वर्षांपासून कार्यरत आहे ‌.तिन्ही कंपनीमध्ये कामगार हे नियमित कामगारांप्रमाने काम करीत आहे

कोविड काळ असो,वादळ असो, बिल वसुली असो, कंपनीवर  इतर कोणतेही संकट असो हा कंत्राटी कामगार सह्याद्री प्रमाणे धाडसाने उभा राहत आहे .दि.०७ जुलै २०२४ रोजी कायम कामगारांना पगार वाढ करण्यात आली. परंतु कंत्राटी कामगारांच्या पदरात मात्र निराशा झाली. कायम कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांना सुद्धा पगार वाढ करण्यात यावी.अशी मागणी तांत्रिक ॲप्रेंटिस,कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या