🌟तांत्रिक ॲप्रेंटीस,कंत्राटी कामगार असोसिएशनचे आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन.....!


🌟तांत्रिक ॲप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी दिली माहिती 🌟

मुंबई :- महावितरण,महापारेशन,महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत शासन व तिन्ही कंपनीचे प्रशासन उदासीन असल्याने त्यांचे लक्ष वेधण्याकरीता  आझाद मैदान मुंबई येथे दि.०२ जुलै २०२४ रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात करण्यात आले असल्याची माहिती तांत्रिक ॲप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात दिली आहे.

  कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, महामारीच्या काळात कंत्राटी कामगारांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, याकरीता विशेष भरती मोहीम राबवावी, कंत्राटी कामगाराकरीता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी. शिकाऊ उमेदवारांना तिन्ही कंपनीमध्ये चुतुर्थ श्रेणीतील सरळ सेवा भरती मध्ये  १०० टक्के आरक्षण त्वरीत लागू करावे, कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीवर घेण्यात यावे, शासन नियमाप्रमाणे महावितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवावी.कत्रांटदार मासिक वेतनामधुन ४०००ते ६०००रुपयाची मागणी केली जाते ऊर्जामंत्री फडणवीस साहेब यांनी वर्षाला ५ गुण देण्यात यावी अशी घोषणा केली, कायम कामगार प्रमाणे विमा कवच आदी प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक वेळा शासन व प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने अनेक आंदोलने करूनही दखल घेत नसल्याने तसेच राज्याचे ऊर्जामंत्री महोदयांनी ९ मार्च २०२४ रोजी कंत्राटी कामगारांना सरळ सेवा भरती मध्ये प्राधान्य व शाश्वत रोजगाराची  हमी बाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते परंतु शासन व प्रशासन स्तरावर केलेल्या घोषणेबाबत उदास उदासीनता दिसत असल्याने कंत्राटी कामगारांमध्ये  प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.सदरहु राज्य व्यापी आंदोलन तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रिय अध्यक्ष दिलीप कोरडे, उपाध्यक्ष बी.आर.पवार,गोपाल गाडगे,सतिश भुजबळ, सरचिटणीस प्रभाकर लहाने, उप सरचिटणीस नितिन भैय्या चव्हाण, शिवाजी शिवणेचारी,संजय उगले,राज्य सचिव आनंद जगताप,रघुनाथ लाड,  संघटक महेश हिवराळे, आर आर ठाकूर, कोषाध्यक्ष गजानन अघम, दत्तू भोईर, विक्रम चव्हाण, तांत्रिक टाईम संपादक सुनिल सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर, संस्थापक अध्यक्ष किरण कहाळे, प्रकाश वाघ, अनिल सरोदे यांचा मागदर्शनाखाली करण्यात  आले. या याप्रसंगी  राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, राज्य उपाध्यक्ष राहिल शेख, नितिन चव्हाण,अनिल चव्हाण, सरचिटणीस प्रदिप पाटील,उपसरचिटणीस शंकर जारकड,अतुल पाटील,प्रताप खंदारे,प्रमोद मालेराव, राज्य कोषाध्यक्ष राम कुटे, अनिवेश देशमुख,विकास ठुसे आदी सह शेकडो कंत्राटी कामगार उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या