🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहावर गुन्हा दाखल, अपघातानंतर मिहीर शहा फरार🌟

* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये  गेले शेतकऱ्यांच्या बांधावर 

* मासे आणण्याठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला चारचाकीनं नेलं फरफटत, महिलेचा मृत्यू, वरळीतील ॲट्रीया मॉलजवळील घटना

* वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह जुहू परिसरातील बारमधून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही समोर, रात्री १ वाजून ४२ मिनीटांनी मिहीर आणि त्याचे मित्र मर्सिडीज कारमधून बाहेर पडले

* वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहच्या अपघातग्रस्त गाडीची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी, गाडीतील अनेक नमुने तपासणीसाठी गोळा केले जाणार

* वरळी अपघातापूर्वी आरोपी मिहीर शाहनं आपल्या चार मित्रांसोबत केलं होतं मद्यप्राशन, १८ हजार ७३० रुपये त्यांचं बिल झालं, पोलिसांनी सीसीटिव्हीचा डीव्हीआर जप्त केलाय, जुहूतील बार मालकाची माहिती

* वरळी हिट अँड रन केसमधील आरोपी मिहीर शाह अजूनही फरार, आरोपीचे वडील राजेश शाह आणि कारचालकाला अटक, उद्या कोर्टात हजर करणार

* बिएमडब्ल्यू (BMW) मिहीरच चालवत होता, मिहीरनं माझ्या पत्नीला फरफटत नेलं, मृत महिलेच्या पतीचा दावा, प्रदीप नाखवा यांच्या डोळ्यात पाणी

* मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणातील चालक कुठल्याही पक्षातला असला तरी कारवाई झालीच पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी, तर कायदा सर्वांसाठी समान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर 

* कोकणात पावसाची जोरदार बॅटींग, अनेक ठिकाणी पाणी साचलं, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील शाळा, कॉलेजला उद्या सुट्टी

* नवी मुंबईत अनेक ठिकाणी पूरस्थिती, कळंबोलीत नागरीवस्तीत पाणीचं पाणी, ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे रखडल्या

कल्याणच्या मुरबाडमधील काळू नदीवरील पूल पाण्याखाली, शहापूर आणि  मुरबाडमधील १८ गाव - पाड्यांचा संपर्क तुटला

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य तुकोबा महाराजांच्या पालखीचा काटेवाडीत डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळा 

* शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहावर गुन्हा दाखल, अपघातानंतर मिहीर शहा फरार

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या