🌟जंग-अजित न्यूज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातील पहिली घटना : राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबीत🌟

* उत्तर प्रदेशातील हाथरस येथील भोले बाबांच्या सत्संगात मोठी दुर्घटना, चेंगराचेंगरीत 50 हून अधिक जणांचा मृत्यू, मात्र शेकडो भक्तांनी प्राण गमावल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा, चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती.

* महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांचे निलंबन ; विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 5 दिवसांसाठी निलंबित : भाजप आमदार प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई,उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा निर्णय.

* विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे काही बोलले त्याबद्दल पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्राची माफी मागतो, पण बहीण-भावांच्या नात्यावर अपशब्द बोलणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावर काय कारवाई करणार, उद्धव ठाकरेंचा सवाल ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन हे एक षडयंत्र असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप 

* विधानपरिषदेला हायव्होल्टेज सामना रंगणार, मविआकडून शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील रिंगणात

* विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच मिलिंद नार्वेकरांमध्ये जुना उत्साह संचारला,फ्लोअर मॅनेजमेंटसाठी कामाला लागले प्रवीण दरेकरांशी चर्चा आणि आशिष शेलारांचीही गळाभेट  

* शाळेतील मुलांचा गणवेश, पोषण आहारामध्ये तडजोड नाही, क्वालिटी बघा म्हणत एकनाथ शिंदेंनी विधानसभेत नवा अन् जुना शालेय गणवेश दाखवला.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोन तास युद्ध थांबवलं होतं, इंडिया आघाडीसाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुरेशे, राज्याच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं 

* खोटं पसरवूनही पराभव झालेल्यांच्या वेदना समजू शकतो, संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; तर मणिपूरला न्याय द्या, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी.

 * हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतःच दहशतवादी, रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य तर कामकाजातून भाषणाचा भाग वगळल्याने राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना नाराजीचं पत्र 

* विधानभवनाच्या लॉबीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेट, हसतखेळत संवाद, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या.

* क्रिकेटपटू केदार जाधव अतुल सावेंसोबत विधानभवनात दाखल, भाजपच्या माध्यमातून राजकीय इनिंग सुरु करणार असल्याच्या चर्चा

* अंतरवालीत मनोज जरांगेंवर ड्रोनद्वारे टेहाळणी, झेड प्लस सुरक्षा देण्याची गावकऱ्यांची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांकडून मुद्दा उपस्थित, सरकारचं चौकशीचं आश्वासन ; मराठा समाजात मेसेज गेलाय की आता आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यासाठी लढावं लागणार, मनोज जरांगेंचे आवाहन 

* अहमदनगरच्या राहुरीत राजू शेट्टींचं रास्तारोको आंदोलन, दूध उत्पादकांना 40 रुपये दर न दिल्यास मुंबईकडे जाणारा पुरवठा रोखण्याचा इशारा 

* अमरावती व अकोला येथे लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांची दलालांकडून आर्थिक लूट, अनेक केंद्रावर तुफान गर्दी, चेंगराचेंगरीची परिस्थिती 

* सत्ताधाऱ्यांशी संबंधित राज्यातील 13 साखर कारखान्यांना 1,898 कोटींचे कर्ज मंजूर, राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी 

* 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

* उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, ९० पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी

* काँग्रेसचे साथीदार हिंदू धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी करतात, हेच का तुमचे संस्कार, सभागृहात मोदींचा संतप्त सवाल..हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न..राहुल गांधींवर कारवाई करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागणी

* लोकसभेत काल बालबुद्धीचा खेळ पाहायला मिळाला.. लहान मुलांची नक्कल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर सडकून टीका, विरोधकांचा गदारोळ

* लोकसभा निकलावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका...१३ राज्यात काँग्रेसनं शून्य जागा जिंकली..तर आजची काँग्रेस ही परजीवी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या