🌟नांदेड येथील एकलव्य हॉस्टेलात नव्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झालेल्या तिरुपती शिंदे यांचा सत्कार...!


🌟सामान्य शेतकरी कुटुंबातील तिरुपती शिंदे म्हणजे हॉस्टेलमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थीच🌟


एका सामान्य शेतकऱ्यांच पोरग फौजदार झाल्याचा आनंद सर्वांनाच पण आपल्यासारखी असंख्य सामान्य घरातून आलेली पोरं प्रशासनात गेली पाहिजे याची तळमळ ही तितकीच,निकाल लागला आणि लगेच पीएसआय पदी निवड झालेल्या आमचे सहकारी मित्र तिरुपती शिंदे यांनी आपल्या एकलव्य  हॉस्टेलला भेट दिली आम्ही त्यांचा विशेष सत्कार केला. 

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तिरुपती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये जाऊन कशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे, आई वडिलांचे स्वप्न कशी पूर्ण केली पाहिजे, आणि स्वप्न पूर्ण केल्यानंतर काय आनंद होत असतो याचा सविस्तर मार्गदर्शन केलंच, आणि आमच्या विद्यार्थ्यांनी एखादा मान्यवर व्यासपीठावर असतो आणि त्यांची सर्वजण सामूहिक मुलाखत घेतात त्या प्रकारची आपल्या एकलव्य निवासी हॉस्टेल नांदेड च्या विद्यार्थ्यांनी त्यांची मुलाखत घेतली ती मुलाखत देखील खूप  प्रेरणादायी  झाली. विद्यार्थी अनेक प्रश्न विचारत होते मनात येतील ते प्रश्न विचारत होते.आणि आमचे तिरुपती शिंदे देखील त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचे काम करत होते. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न विचाराची संधी होती. आणि मग सर्वांनी मिळून त्याचा सत्कार देखील केला. तिरुपती शिंदे म्हणजे  हॉस्टेलमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थीच. या सर्व चर्चेनंतर मार्गदर्शन नंतर त्यांच्यासारखी प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी पोलीस प्रशासनामध्ये वेगवेगळ्या पदावर रुजू होतील आणि रुजू होणार आणि आमची अशी स्वप्न आहेत असे देखील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना बोलून दाखवलं.......

तिरुपती शिंदे आपले मनापासून खूप खूप आभार धन्यवाद आपणास पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..

--- गणेश अनंतराव शिंदे संचालक एकलव्य हॉस्टेल नांदेड 

मो.9975723641

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या