🌟वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी साधला एनसीसी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद....!


🌟एनसीसीच्या ६० विद्यार्थ्यांशी विविध विषयावर केवळ आयपीएस अधिकारीच नव्हे तर मैत्रिण म्हणून मनमोकळेपणाने चर्चा🌟


फुलचंद भगत

वाशिम - बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) च्या विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सलग दोन दिवस मुक्त संवाद साधुन त्यांच्याशी हितगुज साधले, शनिवार २९ व रविवार ३०जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी एनसीसीच्या ६० विद्यार्थ्यांशी विविध विषयावर केवळ आयपीएस अधिकारीच नव्हे तर एक मैत्रिण म्हणून मनमोकळेपणाने चर्चा केली.

मतदान जनजागृती व राष्ट्रीय कार्यात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या मुक्तसंवादात आपल्या बालपणाच्या गोष्टी सांगत विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात कसे टिकून राहायचे, कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती खूप मन लावून करायची यश मिळतेच, पुस्तक वाचन सुद्धा फार महत्त्वाचे आहे ते सुद्धा मन लावून केल्यास आपल्याला कुठलीही परीक्षा अवघड जात नाही, वाचन केल्याने प्रत्येक वेळेस नवनवीन गोष्टी उलगडतात, माहिती होतात, अभ्यास कसा करायचा, स्मरणात कसा ठेवायचा या बाबी जिल्हाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मुक्त संवादातून पटवून दिले. वेळ आणि नियोजन असेल तर आपण आपला छंद सुद्धा चांगला प्रकारे जोपासता येतो, त्याचबरोबर शिस्त या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजेत असे त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे एनसीसी अधिकारी अमोल काळे यांचे सुद्धा कौतुक केले. या विशेष भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. सर्व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या