🌟 नांदेड येथील शिवभक्त विश्वनाथ तवर परिवाराकडून शेंबाळेश्वराला पंचधातूंचा शिवमुखवटा अर्पण....!


🌟शेकडो भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ🌟 

नांदेड :- यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका व परिसरातील हिंदुचे आराध्य दैवत असलेल्या शेंबाळेश्वराला मृत्युच्या दाढेतून परतलेला नांदेड येथील एक शिवभक्तांने पंचधातूचा शिवमुखवटा अर्पण करीत महापंगत केली आहे. तत्पूर्वी सकाळी शेंबाळेश्वर महादेवाचा रुद्राभिषेक करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील रहिवासी असलेले व सध्या नांदेड स्थित असलेले विश्वनाथ तवर हा पंचेचाळीस वर्ष यांना गतवर्षी सप्टेंबर महिन्यात हृदयविकाराचा धक्का बसला, या आरोग्यासाच्या अडचणीत त्यांनी मनोकामना केली ती फळाला आली आणि ते या मोठ्या आजारातून बाहेर आले. आपण मृत्युच्या दाढेतून बाहेर आल्याने आपले गावाप्रती उतरदायीत्व समजुन शेंबाळेश्वराच्या त्याने शिवपिंडीला पंचधातूचा शिवमुखवटा अर्पण करण्याचे ठरविले होते.

काल दिनांक ४ जुलै गुरुवारी सकाळी रुद्राभिषेक करून त्यानी परिवारासह पंचधातूंपासून तयार करण्यात आलेला शिवमुखवटा शेंबाळेश्वराला अर्पण करून येथे महापंगतीचे आयोजन केले होते. या शिवमुखवट्यामुळे शेंबाळेश्वराच्या सौंदर्यात भर पडली असून, त्यांनी आयोजित केलेल्या पंगतीत हजारो भाविकांनी प्रसाद ग्रहण केला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व भाविक भक्तांचे विश्वनाथ तवर, अजय तवर व परिवाराने आभार मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या