🌟आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी सुरू : दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम.....!


🌟मतदारांनी सहकार्य करण्याचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले आवाहन🌟

परभणी : आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली असून मतदारयादी अंतिम करण्यासाठी दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले आहे.

             या संदर्भात माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयात मंगळवार दि.02 जुलै 2024 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहायक मतदार नोंदणी तथा तहसीलदार डॉ.संंदीप राजपुरे, नायब तहसीलदार (निवडणुक) श्रीमती अनिता वडवळकर यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य उप सचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्रानुसार दिनाक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी याद्वारे मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन पडताळणी करण्याचा दिनाक 25 जून ते 4 जुलै 2024 हा आहे. मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याचा कालावधी दिनांक 5 से 13 जुलै 2024, प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 25 जुलै 2024 हा असून दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दिनाक 25 जुलै ते  9 ऑगस्ट 2024 हा आहे. दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी दिनांक 4 ऑगस्ट 2024 हा असून मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक 20 ऑगस्ट 2024 हा आहे.

            या कार्यक्रमानुसार मतदान केंद्र सुसुत्रिकरणांतर्गत नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित करणे, कमी मतदार संंख्या असलेल्या मतदान केद्रामध्ये 1400 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रातील मतदारांंचे विभाजन करणे, मतदान केंद्राची ईमारत बदल करणे, मतदान केंद्राच्या नावात बदल असल्यास बदल करुन परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेस्तव सादर करण्यासाठी दिनांक 5  ते 13 जुलै 2024 हा कालावधी दिलेला आहे.

             या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 96-परभणी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदार यादी शुध्द करण्यासाठी मयत, कायमस्वरूपी स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यासाठी नमुना नंबर 7 चे अर्ज, 18 ते 19 वर्षे वयोगटातील नवमतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये महिलांचे नाव नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी नमुना नंबर 6 चे अर्ज तसेच दिव्यांग मतदाराना चिन्हांकित करण्यासाठी 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांकडून नमुना क्रमांक 8 चे अर्ज भरून घेण्यासाठी तसेच मतदार यादीतील चुकीच्या नावांची दुरुस्ती करून घेण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) हे मतदारांच्या घरोघरी दिनांक 25 जून ते 4 जुलै 2024 या कालावधीत भेट देऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. 

           सर्व मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य करून मतदार यादी शुध्द करण्यासाठी नाव नोंदणी करावी, मयत मतदाराचे नाव कमी करण्यासाठी नमुना नंबर 7 अर्ज भरुन द्यावेत तसेच मतदार यादीतील नावातील दुरुस्ती व इतर दुरुस्तीसाठी तसेच अपंग मतदारांना चिन्हांकीत करण्यासाठी नमुना क्रमांक 8 अर्ज भरुन देवून प्रशासनास मतदार यादी शुध्द करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे सहायक मतदार नोंदणी तथा तहसीलदार डॉ.संंदीप राजपुरे, नायब तहसीलदार (निवडणुक) श्रीमती अनिता वडवळकर यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या