🌟लोणावळा येथील डोंगराळ धबधब्याचा आनंद घेण्यास गेलेल्या पुण्यातील हडपसर येथील अन्सारी कुटुंबावर काळाचा घाला...!


🌟धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या पाच पैकी तीघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू🌟 

पुणे : पुण्यातील हडपसर येथील अन्सारी कुटुंबीय लोणावळा येथील डोंगराळ भागातील धबधब्यावर पावसाचा आनंद घेण्यास गेले असता अचानक वाढलेल्या धबधब्याच्या प्रवाहात अडकलेल्या अन्सारी कुटुंबातील पाच जण वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची हृदयविदारक घटना दि.३० जुन २०२४ रोजी दुपारच्या सुमारास घडली असून या भयंकर घटनेत तिघांचा मृत्यू झाला असल्याचे तर दोघांचा शोध सुरू असल्याचे समजते रात्र झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते या दुर्दैवी घटनेत साहिस्ता लियाकत अन्सारी वय ३६ वर्षे,अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय १३ वर्षे, उमेरा सलमान उर्फ आदील अन्सारी वय ८ वर्षे या तिघांचा मृत्यू झाला आहे या तिघांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले असून उर्वरित अदनान अन्सारी वय ४ वर्षे आणि मारिया अन्सारी वय ९ वर्षे या दोघांचा शोध सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील हडपसर भागातून लियाकत अन्सारी आणि युनूस खान हे त्यांच्या १७ ते १८ कुटुंबातील सदस्यांसोबत लोणावळ्यात वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेले होते. दोन्ही कुटुंब हे हे दुर्गम भागातील धबधब्यावर गेले होते. हा धबधबा भुशी धरणाच्या पाठीमागे आहे. डोंगराळ भागात असल्याने तिथे कोणी जाण्याचा प्रयत्न करत नाही. खान आणि अन्सारी दोन्ही कुटुंब एकमेकांसोबत वर्षाविहाराचा आनंद घेत होते. गेल्या दोन- तीन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अचानक ज्या धबधब्याच्या पाण्यात हे कुटुंब थांबले तिथं अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्या पाण्याच्या प्रवाहात दहा जण अडकले. पैकी, ५ जण पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. पण पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पैकी तिघांचा मृतदेह मिळाला आहे. दोघांचा शोध सुरू आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या