🌟शहीद बाबा भुजंगसिंघजी चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित 'पंज तख्त यात्रा' टिकिट बुकिंग कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.....!


🌟टिकिट बुकिंग कार्यालयाचे उद्घाटन मुख्य जत्थेदार सिंघ साहीब संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या शुभहस्ते संपन्न🌟


नांदेड : नांदेड येथील गुरुद्वारा शहीद बाबा भुजंगसिंघजी चॅरीटेबल ट्रस्ट,श्री हजूर साहिब नांदेड द्वारा आयोजित यात्रेच्या तिकीट बुकिंग कार्यालयाचे दि.8 जुलै 2024 रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले सदरील भव्य यात्रेसाठी स.रविंदर सिंघ बुंगई यांनी पुढाकार घेतला असून पंज (5) तख्त साहिब व दिल्ली व पंजाब येथील ऐतिहासिक गुरुद्वारा साहिबचे दर्शन घडविण्यासाठी ही यात्रा 25 ऑगस्ट 2024 ते 06 सप्टेंबर 2024 पर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे. 


या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालयाचे काल सोमवार दि.08 रोजी सचखंड तख्त हुजूर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार सिंघ साहिब संत बाबा कुलवंत सिंघ जी यांच्या शुभहस्ते व माननिय सिंघ साहिव भाई जोतिंदर सिंघ जी मीत जत्थेदार, सिंघ साहिब भाई गुरमीत सिंघ जी मीत ग्रंथी,सिंघ साहिब भाई राम सिंघ जी - धुपिया व सहियोगी जत्थेदार, तसेच संत बाबा बलविंदर सिंघ जी कार सेवा वाले,भाई परमवीर सिंघ जी रहरासीया, भाई जतिंदर सिंघ घागरीया, स. खेम सिंघ जी पुजारी, कुलप्रकाश सिंघ चिरागिया, कथाकार तनवीर सिंघ जी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अरदास करुन या टिकिट उद्घाटन करण्यात आले. यावेळी स. महिन्दर सिंघ शहा यांच्या तर्फे यात्रेला आर्थिक सहायता म्हणून 11,000/- रुपयांची देणगी दिली तसेच या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष स. रविंदर सिंघ बुंगई यांनी आपल्या भावना व्यक्त करुन उपस्थित मान्यवरांचे आभार सुध्दा मानले.

या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी स. लड्डू सिंघ महाजन माजी अध्यक्ष, स. सुरिंदर सिंघ मैंबर, स. परमजोत सिंघ चाहेल, स. गुरचरण सिंघ घडीसाज, स. नौनीहाल सिंघ जागिरदार, स. विरेंद्र सिंघ गाडीवाले, स. जगजीत सिंघ चिरागिया माजी सहा. उपायुक्त, स. रविंदर सिंघ मोदी, स. - अवतार सिंघ पहरेदार, स. मनवीर सिंघ ग्रंथी, स. देविंदर सिंघ मोटरांवाले, स. नारायण सिंघ तबेलेवाले, स. देविंदर सिंघ विष्णुपूरीकर, स. बलबीर सिंघ चिरागीया, स. दिलीप सिंघ रागी, स. जीत सिंघ दुकानदार, गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक स. राजदेविन्दर सिंघ, स. शरण सिंघ सोढी एस.ए.एस., स. ठाण सिंघ बुंगई - सहा. अधिक्षक, स. रविन्दर सिंघ कपूर सहा. अधिक्षक, प्रदीप सिंघ मान व गणमान्य मान्यवरांनी आपली उपस्थिती राखली. कार्यालय उद्घाटन प्रसंगी सुमारे 200 टिकिट सुध्दा आरक्षीत झाले असून बुकिंगसाठी भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या