🌟परभणीतील ब्राह्मणगाव ते पाथरी रस्त्याच्या दुसर्‍या परभणी वळण रस्त्याच्या डीपीआरसाठी निधी मंजूर....!


🌟प्रविण देशमुख यांची माहिती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घेतली यांची भेट🌟

परभणी (दि.09 जुलै 2024) : ब्राह्मणगाव ते पाथरी रस्त्याच्या दुसर्‍या परभणी वळण रस्त्याच्या डीपीआरसाठी केंद्रीय भुपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रविण देशमुख यांनी दिली.

              महानगरप्रमुख देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने नागपूरात रविवारी गडकरी यांची भेट घेतली. त्या भेटीतून विविध रस्ते विकासात्मक विषयांवर प्रामुख्याने चर्चा केली. परभणी बाह्यवळण रस्त्यावरील कामात कंत्राटदारामार्फत होणारी फसवेगिरीही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. त्यावेळी गडकरी यांनी त्या गोष्टीची लगेच दखल घेवून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता शेलार यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून तात्काळ वळण रस्त्याच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना बजावल्या. तर शहराचा दुसरा वळण रस्ता ब्राह्मणगाव ते पाथरी रस्ता यासाठी पुन्हा एकदा डिपीआरसाठी निधीची तरतूद करावी, अशीही अपेक्षा शिष्टमंडळाने केली तेव्हा त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी गडकरी यांनी मंजूर केला. वर्षभरातील सातत्यपूर्ण मागणीवर परभणी शहरातील असोला पाटी ते पाथरी रस्त्यावरील पेट्रोलपंपापर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी वन टाईम इंम्प्रुव्हमेंट अंतर्गत 27 कोटी रुपयांच्या मंजूरीबद्दल शिष्टमंडळाने गडकरी यांचे आभार व्यक्त केले.

             दरम्यान,यावेळी महानगरप्रमुख प्रविण देशमुख, परभणी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्रीधर देशमुख, संजय पळसकर, मिलींद टाकळकर, किरण फुटाणे यांच्यासह अन्य उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या