🌟शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्यावर : शिवसेना विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकणार...!


🌟विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले अंबादास दानवे यांची माहिती🌟


संभाजीनगर : शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे रविवार ता. ७ जुलै रोजी शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग यावेळी फुकणार आहे.सकाळी ११ वाजता या मेळाव्यास सुरुवात होणार असून उद्धवजी ठाकरे प्रमुख मार्गदर्शक असणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, शिवसेना नेते तथा जिल्हाप्रमुख असलेले अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य संयोजक म्हणून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मेळाव्याचे नियोजन केले आहे.जिल्ह्यातील सर्व बाराशे शिवसेना शाखाप्रमुख,सरपंच व नगरसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली सदरिल मेळावा तीन सत्रात होणार असून प्रतिमा व द्वीपप्रज्वलन करून याची सुरूवात होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने समारोपण होणार आहे. चला जिंकू या असे प्रथम सत्रचा विषय असून निवडणूक प्रशिक्षण या विषयावर वक्ते वैभव वाघ मार्गदर्शन करणार आहे. संचलन राजेश राठोड आणि स्वागत विजय वाघचौरे आणि बाळासाहेब गायकवाड करणार आहे.

 दुसऱ्या सत्रात बळीराजाचा वाली कोण ? या विषयावर शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले,आमदार उदयसिंग राजपूत, कृषीभूषण भाऊसाहेब थोरात शिवसेना पदाधिकारी यांना माहिती देणार आहे. या सत्राचे संचलन अविनाश गलांडे व भाऊ सांगळे करणार असून स्वागत अशोक शिंदे, दत्ता गोर्डे  व कृष्णा डोणगावकर करणार आहे. अंतिम आणि तिसऱ्या सत्राचे तीन विषय असून पहिल्या विषयावर संघर्ष करीन..लढत राहील .. मी रणरागिणी यावर उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, हाती घेऊ मशाल रे.. पाप जाळू खुशाल रे.. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मार्गदर्शन करणार असून राजकीय आव्हान या विषयावर शिवसेना ते चंद्रकांत खैरे बोलणार आहे. सदरील विषयाचे संचलन राजु वैद्य व स्वागत शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,विश्वनाथ स्वामी, तालुकाप्रमुख संजय मोटे व शहर संघटिका आशा दातार करणार आहे तीन सत्र संपल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून मेळाव्याचा शेवट राष्ट्रगीताने संपन्न होणार आहे. 

यावेळी मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, महानगरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, संजय बारवाल, संतोष जेजुरकर ,शिवा लूंगारे, शहरप्रमुख विजय वाघचौरे ,बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे,विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, संघटक सचिन  तायडे, उपशहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे,  प्रमोद ठेगंडे, राजेंद्र दानवे, संदेश कवडे, सचिन खैरे, विजय वाघमारे, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, उपजिल्हा युवा अधिकारी सागर वाघचौरे उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या