🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळसमध्ये ऑटोचालका विरोधात ताडकळस पोलिसांची कारवाई....!


🌟ताडकळस ते धानोरा जाणार्‍या सार्वजनिक रस्त्यावर ऑटोरिक्षा उभा करून वाहतुकीस अडथळा करणे आले अंगलट🌟 

पुर्णा (दि.११ जुलै २०२४) :पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील धानोरा टी पाँईंट जवळ ताडकळस ते धानोरा जाणार्‍या सार्वजनिक रस्त्यावर ऑटोरिक्षा उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून संबंंधित वाहन चालकाविरोधात ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             पोलीस जमादार नागनाथ भागवतराव पोते  यांच्या फिर्यादीवरून आरोपी गोपाळ पंडीतराव सावंत राहणार मिरखेल ता. जि.परभणी याच्याविरोधात कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार दि.१० जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजण्याच्या सुमारास ऑटोचालक सावंत याने त्याच्या ताब्यातील तीन चाकी ऑटो क्रमांक एमएच-२२ व्ही-१५१४ सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा होवून मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभा केलेला दिसून आला. त्यावरून ताडकळस पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार नागनाथ उर्फे नागेश पोते हे करीत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या