🌟पुर्णा तालुक्यातील मौ.सुहागन गावात जनस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने स्मशानभूमीत ३०० नारळांचे वृक्षारोपण...!


🌟जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री रामराजे भोसले यांच्या संकल्पनेतून संपूर्ण सुहागन गाव झाले नारळमय🌟

पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील मौजे सुहागन येथे दि.०८ एप्रिल २०२४ रोजी जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री रामराजे भोसले यांच्या संकल्पनेतून गावातील स्मशानभूमीसह विविध ठिकाणी ३०० नारळांची झाडे लावण्यात आली व भूमिपूजन करण्यात आले.

 या वृक्षारोणामुळे सुहागन गाव नारळमय झाल्याचे दिसून आले. गावातील सर्व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आले. येणा-या कळात आणखी जवळपास ३०० नारळ लावण्यात मनोदय जनस्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी बोलून दाखवला. श्री कोंडिंबा भोसले, मा. सरपंच  यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  वृक्षारोपणास प्रभाकर भोसले माजी केंद्र प्रमुख, जनार्दन भोसले, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष गणेशराव भोसले, नारायण भोसले, सुंदर भोसले, माऊली भोसले,  आंबादास भोसले, गंगाराम भोसले, मनसे तालूका अध्यक्ष, आनंद बुचाले, गोविंद  भोसले,  महादजी भोसले,भुजंग भोसले, अंगद भोसले,शुभम भोसले,  डिगांबर, , विजयकुमार, सखाराम क-हाळे, दामाजी भोसले, रामचंद्र भोसले व गावातील गावकरी उपस्थित होते.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या