🌟कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ जयंती : "हिस्टरी ऑफ द मराठाज" कार.....!


🌟ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेत दि.१९ जुलै १८१९ रोजी मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले🌟

      एल्फिन्स्टनच्या आज्ञेप्रमाणे कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफने ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेऊन दि.१९ जुलै १८१९ रोजी मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचे कार्य अंगीकारले. थोड्याच अवधीत एल्फिन्स्टनच्या अनुमतीने त्याने लेखनकार्यास आरंभ केला. सातारचे महाराज तसेच अनेक संबंधित सरदार, सरदेशमुख, देशपांडे आणि आदिलशाही, निजामशाही येथील तवारिखा व मराठी बखरी तसेच पत्रे जमवून माहिती गोळा केली. यामध्ये त्यास बाळाजीपंत नातू यांचे फार साहाय्य झाले. हा सर्व इतिहास त्याने सन १८२२ मध्ये एल्फिन्स्टन, ब्रिग्झ, व्हॅन्स केनेडी, विल्यम अर्स्किन, बाळाजीपंत नातू यांना दाखविला व मसुदा तयार केला. श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर ज्ञानवर्धक लेख अभ्यासा... संपादक.

    स्कॉटलंडमधील बॉन्फ या ठिकाणी किनकरडाइन ओनीलच्या ग्रॅंट घराण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव जॉन ग्रॅंट होते. जेम्स ग्रॅंट डफ याच्या वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजेच इ.स.१७९९मध्ये त्याचे वडील वारले. त्याची आई मार्गारिट मिल्न ही ईडनच्या डफ या घराण्यातील होती. तिचा भाऊ इ.स.१८२४मध्ये वारला, त्यामुळे भावाच्या मृत्यूनंतर डफ कुटुंबाची मालमत्ता मार्गारिटला मिल्न यांना मिळाल्यामुळे जेम्स ग्रॅंटला आईकडचे डफ हे घराण्याचे उपनाम घ्यावे लागले. जेम्सच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेम्स व त्याची आई उत्तर स्कॉटलंडमधील ॲबरडीन या शहरात राहायला आले. जेम्सने तेथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले व त्याच शहरातील मारिशल महाविद्यालयात प्रवेश घेतला. जेम्सने त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून सनदी सेवेत नोकरी करावी, अशी त्याच्या आईची इच्छा होती. परंतु नोकरी मिळवण्यासाठी जो वेळ लागणार होता, तो जेम्सला नको होता. म्हणून महाविद्यालयीन शिक्षण सोडून त्याने आपला देश सोडला व भारताकडे प्रयाण केले. इ.स.१८०६मध्ये ग्रॅंट डफ मुंबईत उतरला. त्याने मुंबईच्या लष्करात कॅडेट- सैन्य प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश मिळवला व एप्रिल १८०७मध्ये तो लष्कराच्या सेवेत दाखल झाला. इ.स.१८०८मध्ये काठेवाडमधील लुटारुंच्या मालिया किल्ल्यावर इंग्रज सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात ग्रॅंट डफने शौर्य दाखवले. इ.स.१८१० मध्ये त्याची लेफ्टनंट पदावर पदोन्नती झाली. त्याने फार्सी भाषा आत्मसात केली. त्यामुळे इंग्रज पलटण- बटालियनचा फार्सी दुभाषी म्हणून तो निवडला गेला होता.

         ग्रॅंट डफ हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात. तो मराठ्यांच्या इतिहासावर लिहिणारा सुप्रसिद्ध इतिहासकार होता. त्याचे पूर्ण नाव कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ होते. ग्रँट या नावाने तो अधिक परिचित आहे. त्याचा जन्म बॅम्फ, स्कॉटलंड येथे दि.०८ जुलै १७८९ रोजी झाला. अबर्डीन येथील मार्शल महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला; पण शिक्षण अपुरे टाकून तो वयाच्या सोळाव्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीत, मुंबईच्या लष्करात नोकरीला आला. सन १८०६ साली बॉम्बे नेटिव्ह इनफंट्री अथवा बॉम्बे ग्रेनेडिअर्समध्ये त्याला अधिकाराची जागा मिळाली. एल्फिन्स्टनने त्यास मुद्दाम पुण्यास बोलावून घेतले. सन १८१७च्या खडकी येथील मराठ्यांबरोबरच्या युद्धात त्याने प्रसंगावधान दाखवून शौर्य दाखविले. या सुमारास त्याचा एल्फिन्स्टनशी चांगला परिचय झाला आणि त्यास कॅप्टन हा किताब मिळाला. सन १८१८मध्ये त्याची एल्फिन्स्टनने साताऱ्यास पोलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती केली. तो साताऱ्यास सन १८१८ ते १८२२ अशी चार वर्षे राहिला आणि साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहास सुशिक्षित केले. सन १८२३च्या जानेवारीत तो मायदेशी रजा घेऊन गेला, तो पुन्हा हिंदुस्तानात परत आला नाही. सन १८२५मध्ये त्याने कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला. तत्पूर्वी त्याची आई वारली. त्याचवर्षी जेन कॅथरिन या तरुणीशी त्याने विवाह केला. तिची काही संपत्ती त्यास मिळाली. म्हणून उर्वरित आयुष्य त्याने आपली संपत्ती व शेती यांची देखभाल करण्यात घालविण्याचे ठरविले.

           एल्फिन्स्टनच्या आज्ञेप्रमाणे कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफने ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेऊन दि.१९ जुलै १८१९ रोजी मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचे कार्य अंगीकारले. थोड्याच अवधीत एल्फिन्स्टनच्या अनुमतीने त्याने लेखनकार्यास आरंभ केला. सातारचे महाराज तसेच अनेक संबंधित सरदार, सरदेशमुख, देशपांडे आणि आदिलशाही, निजामशाही येथील तवारिखा व मराठी बखरी तसेच पत्रे जमवून माहिती गोळा केली. यामध्ये त्यास बाळाजीपंत नातू यांचे फार साहाय्य झाले. हा सर्व इतिहास त्याने सन १८२२मध्ये एल्फिन्स्टन, ब्रिग्झ, व्हॅन्स केनेडी, विल्यम अर्स्किन, बाळाजीपंत नातू यांना दाखविला व मसुदा तयार केला. जॉन मरे पब्लिशर्स लि.कंपनीने या पुस्तकाचे "मोगल सत्तेचा ऱ्हास आणि ब्रिटीश सत्तेचा उदय" असे नामकरण केल्यास छापू म्हणून कळविले. तेव्हा मला मराठ्यांचाच इतिहास केवळ सांगावयाचा आहे, असे बाणेदार उत्तर देऊन त्याने स्वखर्चाने लाँगमन्स लि.कंपनीकडून सन १८२६मध्ये हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला. या व्यवहारात त्यास २,००० पौंड खर्च आला. त्यांपैकी ३०० पौंड कसेबसे वसूल झाले. सन १९२१पर्यंत या ग्रंथाच्या सहा आवृत्या निघाल्या. सन १८२९मध्ये कॅ.डेव्हिड केपेन व बाबा साने यांनी या ग्रंथाचे मराठ्यांची बखर या शीर्षकाने मराठीत भाषांतर केले. त्याच्याही सहा आवृत्या निघाल्या. त्याच्या ग्रंथावर प्रथम कुठेच समीक्षण आले नाही व टीकाही झाली नाही. मात्र नंतरच्या मराठी इतिहासकारांनी त्याच्या हिस्टरी ऑफ द मराठाज या ग्रंथावर सडेतोड टीका केली. तथापि मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचा त्याचा प्रयत्न सर्वांनी मान्य केला.

          एडन येथे स्थायिक झाल्यावरही त्याचा प्रतापसिंह व एल्फिन्स्टन यांच्याशी प्रदीर्घ काळ पत्रव्यवहार चालू होता. सन १८४८ साली सातारच्या राजाची पदच्युती आणि राज्य खालसा या संबंधीची ब्रिटिश नीती त्याला आवडली नाही. त्यास दोन मुलगे आणि एक मुलगी होती. त्याचा एक मुलगा माउंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन ग्रँट डफ हा पुढे मद्रासचा गव्हर्नर झाला. पुढे कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ हा एडन येथे दि.२३ सप्टेंबर १८५८ रोजी मरण पावला.

!! ग्रँट डफ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जी !!

                - संकलन व सुलेखन -

 श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

 (प्रेरणादायी भारतीय संस्कृतीचे व इतिहासाचे गाढे अभ्यासक.)

     रामनगर वॉर्ड, गडचिरोली जि.गडचिरोली.

      फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या