🌟पुर्णा जंक्शन रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल महाघोटाळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सोईस्कररित्या गुलदस्त्यात ?


🌟सिबीआय चौकशीला बगल देण्याच्या दृष्टीनेच सहा महिन्यांच्या कालावधी नंतरही तपास चालू असल्याचा बनाव🌟


पुर्णा जंक्शन रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल महाघोटाळा दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास चालू असल्याच्या गुळगुळीत उत्तराच्या नावाखाली सोईस्करित्या गुलदस्त्यात टाकण्याचा गंभीर प्रकार समोर येत असून सदरील प्रकरणाची महाव्याप्ती पाहता प्रकरण सिबीआय/प्रवर्तन निर्दशालयाकडे वर्ग करण्याचे आवश्यक असतांना देखील या गंभीर प्रकरणाला दि.२९ जानेवारी २०२४ रोजीच्या ५ हजार ५०० लिटर डिझेल चोरी प्रकरणा पुरते मर्यादित ठेवून या प्रकरणातील घरभेद्यांना दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी केवळ यामुळेच तर वाचवत तर नाही ना की या डिझेल घोटाळा प्रकरणात त्यांचे देखील हात बरबटलेले असावेत ? असा प्रश्न आता उपस्थित होत असून पुर्णा रेल्वे स्थानकावरील रेल्वे डिझेल डेपोत कार्यरत डिझेल घोटाळेबाज मुख्य आरोपी आरसीडी मुख्य अधिक्षक माधव बलफेवाड (पुर्व रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी),आरसीडी सहाय्यक अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन,डि.कृष्णा आरसीडी चिफ लोको इन्स्पेक्टर,ओएस कांचन कुमार हे अधिकारी/कर्मचारी जाणीवपूर्वक डिझेल टँकर खाली करीत असतांना डिझेल आवक/जावक दर्शवण्यासाठी लावले गेलेल्या मिटरसह (Flow Meter) सिसीटीव्ही कॅमेरे देखील पुर्णपणे बंद करुन सोईस्कररित्या डिझेल घोटाळ्याची मालिका चालवत असतांना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे पुर्णा रेल्वे क्र्यु-बुकींग लॉबीचे मुख्य कर्मीदल अधिक्षक चेपूरी सुरेश यांनी आर्थिक संगनमतातून यापूर्वी देखील असंख्य वेळा रेल्वे डिझेल घोटाळ्याची मालिका नियोजनबद्ध पद्धतीने चालविल्याचे निदर्शनास येत आहे यातील मुख्य कर्मीदल अधिक्षक चेपूरी सुरेश यांच्यावर रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल चोरीकडे बेजबाबदारपणे दुर्लक्ष केल्यासह मेकॅनिकल स्टोअररुम जळीत प्रकरणाचा देखील ठपका ठेवण्यात आला असतांनाच दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच तपासयंत्रणांकडून सदरील घोटाळ्यांच्या मालिके वरील पडदा उघड होता कामा नये या दृष्टीने कासवगतीने तपास केल्याचे सोंगं तर रचल्या जात नाही ना ? असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे.


सदरील डिझेल घोटाळा प्रकरण दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेत गाजल्यानंतर या प्रकरणातील आरोपीतांवर सहाय्यक विभागीय व्यवस्थापक (एमडीआरएम) श्री मिना यांनी कारवाई करण्या संदर्भात नोटीसा बजावण्याचे नाट्य सोईस्कर रित्या रंगवले खरे परंतु कठोर कारवाईला मात्र बगल दिल्याचे दिसून आले रेल्वे डिझेल घोटाळा प्रकरण लोकसभेत खासदार संजय जाधव यांनी उपस्थित केल्यानंतर दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांना तीस दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केले होते या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून त्या समितीच्या माध्यमातून संबंधित आरोपीतांना वाचवण्याच्या उद्देशानेच आम्हाला जी कारवाई करायची ती आम्हीं केली असल्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केल्याचे समजते.

🌟गुंटगल डिविजन लाचखोरी प्रकरणाच्या धर्तीवर पुर्णा रेल्वे डिझेल घोटाळा प्रकरणाची देखील सिबीआय चौकशी आवश्यक :-

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुंटगल डिविजन अंतर्गत विभागातील रेल्वे व्यवस्थापक विनीतसिंह यांच्यासह अन्य चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांधकाम गुत्तेदाराला लाच मागितल्यानंतर संबंधित गुत्तेदाराने नमूद अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करुन कारवाई केल्याने संपूर्ण रेल्वे प्रशासनात खळबळ माजली परंतु त्याहीपेक्षा गंभीर प्रकार दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोत घडला मागील अनेक वर्षांपासून रेल्वे डिझेल डिपोत कार्यरत अधिकारी/कर्मचारी डिझेल टँकर खाली करीत असतांना डिझेल आवक/जावक दर्शवण्यासाठी लावले गेलेल्या मिटरसह (Flow Meter) सिसीटीव्ही कॅमेरे देखील पुर्णपणे बंद करुन कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करीत रेल्वे प्रशासनाला करोडो रुपयांचा चुना लावीत आपल्या व आपल्या नातेसंबंधातील लोकांच्या नावावर करोडो रुपयांची संपत्ती साठवत असतांना मात्र हे प्रकरण सिबीआय/प्रवर्तन निर्दशालयाकडे वर्ग न करता संबंधित प्रकरणातील आरोपीतांना मात्र क्लिनचीट देण्याचा गंभीर प्रकार निश्चितच गंभीर म्हणावा लागेल....
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या