🌟मंगरुळपीर वाशिम मतदारसंघाचे लोकहितवादी "अवलिया आमदार" आ.लखन मलिक....!


🌟लोकहितवादी 'अवलिया आमदाराचे समस्त महिलावर्गात कौतुक🌟


फुलचंद भगत

वाशिम :- जिथे काही काही आमदार आपल्याच कार्यकर्त्यांना आपल्या गाडीत सुद्धा बसू देत नाहीत. तिथे वाशिम - मंगरुळपीर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार स्वतच्या रूम मधे अनोळखी व्यक्तींना सुध्दा जागा उपलब्ध करून देतात.अशा या लोकहितवादी 'अवलिया आमदाराचे समस्त महिलावर्गात कौतुक होत आहे.

               झालं असं की सध्या मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. त्यामुळे विविध संघटना विविध प्रकारची लोक आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मुंबई येथे आलेले असतात पण त्यांच्या या मागण्या कोणाकडे मांडाव्या याचे सुद्धा बऱ्याचशा लोकांना ज्ञान नसते किंवा योग्य माहिती नसते अशाच काही २५-३० महिला मंडळी आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसल्या होत्या. दिवसभर उपोषण करायचे आणि संध्याकाळी मिळेल तिथे आश्रय घ्यावा. असा त्यांचा गेल्या चार-पाच दिवसापासून चा दैनंदिन कार्यक्रम.संध्याकाळच्या वेळी ह्या महिला आमदार निवासाकडे आल्या आणि त्यांची होणारी गैरसोय बघून मा.श्री. लखन भैय्या मलिक यांनी त्या महिलांची आपुलकीने विचारपूस केली. त्यानंतर असे लक्षात आले की या महिला वेगवेगळ्या मतदार संघातील असून त्यांना आता रात्री झोपण्याची व्यवस्था करून द्यावी लागेल.श्री लखन भैय्या यांनी तात्काळ त्या सर्व महिलांना आमदार निवास मधील त्यांच्या ५०१ क्रमांकाच्या रूममध्ये त्यांची व्यवस्था करून दिली. आणि ज्या महिलांना त्या रूम मध्ये जागा मिळाली नाही त्या सर्वांसाठी तात्काळ झोपण्यासाठी गाद्यांची व्यवस्था करून बाहेर असलेल्या जागेत व्यवस्था करून दिली . नंतर असे लक्षात आले की या महिलांनी जेवण सुद्धा केलेले नाही. लगेचच लखन भैय्या यांनी त्या सर्व उपस्थित महिलांची जेवणाची सोय करून दिली.या महिलांपैकी कोणी अकोला मतदारसंघातील कोणी बाळापूर,अकोट,तेल्हारा, रिसोड आणि कारंजा तर कोणी परभणी जिल्ह्यातील रहिवासी उपस्थित असलेल्या महिलांना हे सुद्धा माहिती नाही की आपल्या मतदारसंघातील आमदार कोण ? 

अशा या महिलांसाठी लखन भैय्या खरोखर देव दूत म्हणून समोर आले लखन भैय्या तुमच्या या कार्याला खरोखर मनापासून सलाम आहे असे मंगरुळपीर येथील सरपंच गोपाल लुंगे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या