🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथील ग्रामरोजगार सेवकाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत केला आर्थिक अपहार...!


🌟विरोधात सबळ पुरावे सादर : तरीही सुनावणीच्या नावावर तक्रारदारांना पुराव्यासह उपस्थित राहण्याचे बिडीओचे अजब आदेश🌟 

🌟महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेसह जलजिवन मिशन योजना, फळबाग लागवड योजनांत देखील कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार🌟  

🌟तालुक्यात सर्वत्र महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील रोजमजूरांच्या तोंडचा घास पळवण्याचचे गंभीर प्रकार🌟 


पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा तालुक्यातील गौर येथील ग्रामरोजगार सेवकाने भ्रष्टाचाराचा कळस गाठत चक्क सिताफळ फळबाग लागवड लाभधारकांच्या जॉब कार्डवर स्वतःचाच खाते क्रमांक टाकून रोजमजूराची मजूरी परस्पर हडपल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या संदर्भात तक्रारदार शरद विश्वनाथ जोगदंड व भगवान नरहरी जोगदंड यांनी जिल्हाधिकारी परभणी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सबळ पुराव्यांसह रितसर तक्रार दिल्यानंतर देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीअंती कारवाईच्या आदेशाला सोईस्कर बगल देत पुर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड यांनी संबंधित तक्रारदारांना दि.२७ जुन २०२४ रोजी नोटीस जारी करून दि.०१ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास पुराव्यांसह उपस्थित राहण्याचे या नोटीसीत नमूद केले संबंधित तक्रारदारांनी लेखी तक्रारीसह पुरावे सादर केल्यानंतर देखील सुनावणीस येतांना गटविकास अधिकारी आंदेलवाड यांनी पुराव्यांसह उपस्थित राहण्याचे काढलेले फर्मान अजबच म्हणावे लागेल.


या संदर्भात सविस्तर वृत्त असे की गौर येथील ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांनी डब्ल्यूएलपी-बिडीओ गौर ज्ञानेश्वर सिताराम जोगदंड यांचे सिताफळ वैयक्तिक फळबाग लागवड कामाचा सांकेतांक : १८१७००८०४८/आयएफ/१२३५३९९३२० या कामाच्या मस्टरवर काम करणारे ज्ञानदेव सिताराम जोगदंड यांच्या जॉब कार्डवर चक्क स्वतःचे खाते क्रमांक टाकून प्रत्येकी १५३६/-रुपयें याप्रमाणे सहा (मस्टर क्रमांक ७४४०,८९०९,१०६४९,१३७२७,१७५८७,१९१३६) मस्टरवरील मजूरी स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वर्ग करुन अपहार केला व त्याची मजूरी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी उपयोगात आणली सदरील जॉब कार्डवर अद्यापही ही त्यांचे स्वतःचे खाते क्रमांक जोडलेले असल्यानचे पाहावयास मिळत असून सदरील ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे यांनी रोजमजूरांच्या मजूरीवरच नव्हे तर फळबाग योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचे मस्टर काढण्याच्या नावावर शेतकऱ्यांकडून स्वतःसह स्वतःच्या कुटुंबासाठी सदस्यांच्या खात्यावर देखील पैसे घेतल्याचे उघड झाले आहे. 

दरम्यान पुर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आंदेलवाड यांनी दि.०१ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपीत ग्रामरोजगार सेवक मारोती पारवेसह तक्रारदार शरद विश्वनाथ जोगदंड व भगवान नरहरी जोगदंड यांना देखील बोलावून त्यांचे पुन्हा एकदा जवाब नोंदवले असले तरी यानंतर देखील आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामरोजगार सेवक पारवेकर कारवाई होईल की नाही अशी शंका उपस्थित होत असून संबंधित तक्रारदार यांनी गटविकास अधिकारी आंदेलवाड यांच्या चौकशीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला असून काल बुधवार दि.०३ जुलै २०२४ रोजी आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामरोजगार सेवक मारोती पारवे विरोधात उपमुख्य कार्यकारी अधिकारी परभणी यांच्याकडे पुन्हा एकदा लेखी स्वरूपात तक्रार देऊन सखोल चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या