🌟नवी दिल्लीतील रेल्वे क्र्यु-बुकींग लॉबीत विरोधी पक्षनेते राहूल गांधीनी घेतली पन्नास लोको पायलटांची भेट...!🌟विरोधी पक्षनेते गांधीच्या भेटीवेळी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात कार्यरत लोको पायलट रविकांत कुमारजी यांचाही समावेश🌟 

🌟सरकार समर्थक काही वृत्तवाहिन्यांना दिसला राहूल गांधींचा स्टंट लोकोपायलट ही बनावट असल्याचा लावला जावई शोध🌟 नांदेड (विशेष वृत्त) :- भारतीय रेल्वेच्या पाठीचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व रेल्वे प्रवासा दरम्यान हजारो रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित रेल्वे प्रवासाची जवाबदारी खांद्यावर असलेल्या लोको पायलट (रेल्वे ड्रायव्हर),सहाय्यक लोको पायलट यांच्यावर रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने अन्याय होत असून रेल्वे मंत्रालयाने त्यांना 'जुनी पेन्शन' योजना लागू करावी या मागणीसाठी त्यांच्याकडून वेळोवेळी होणारा संघर्ष पाहता देशाची सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी शुक्रवार दि.०५ जुलै २०२४ रोजी नवी दिल्लीतील रेल्वे क्र्यु-बुकींग लॉबीत जाऊन लोको पायलट यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.


  यावेळी जवळपास पन्नास लोको पायलटांची उपस्थिती होती यावेळी विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्याशी लोको पायलट यांनी जुनी पेन्शन योजना बहाली करण्या संदर्भातही चर्चा केली यावेळी उपस्थित लोको पायलट यांच्या शिष्टमंडळात दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील एक लोकोपायलट तथा ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनचे केंद्रीय संघटन सेक्रेटरी रविकांत कुमारजी यांचा ही समावेश होता परंतु या सर्व घटनाक्रमाला काही सत्ताधारी समर्थक वृत्तवाहिन्यांनी तसेच केंद्रीय पिआरओ यांनी या घटनाक्रमाला खोटा स्टंट करार देत या शिष्टमंडळातील लोकोपायलट बनावट असल्याची देखील अफवा फैलावण्याचा दांभिकपणा केल्याने लोको पायलट/सहाय्यक लोको पायलटांमध्ये तिव्र असंतोष पसरला असून या शिष्टमंडळात सहभागी असलेले दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील लोको पायलट रविकांतजी आज रविवार दि.०७ जुलै रोजी दिल्लीहून पुर्णेला परत येत असून प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी मोबाईल क्रमांक 9561012216 या क्रमांकावर संपर्क साधल्यास 'दुध का दुध पाणी का पाणी' होईल असे मत रेल्वे कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या