🌟परभणी हिंगोली नांदेड तिन्हीं जिल्ह्यात जानवला भूकंपाचा सौम्य धक्का.....!


🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनो घाबरू नका : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे 

नांदेड/परभणी : मराठवाड्यातील हिंगोलीसह नांदेड परभणी जिल्ह्यातील शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागात देखील आज बुधवार दि.१० जुलै २०२४ रोजी सकाळी जवळपास ०७.१४ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.


हिंगोली/परभणी व नांदेड या तीन जिल्ह्यात याच क्षणाला भूकंपाचा धक्का बसला. त्याप्रमाणेच परभणी तसेच नांदेड शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी ०७.१४  किंवा ०७.१५ वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला काही नागरिकांना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला तर भर झोपेत असलेल्या काही नागरिकांना धक्क्याची जाणीव देखील झाली नाही.....

🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनो घाबरू नका : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे 

 परभणी हिंगोली तसेच नांदेड जिल्ह्यातील काही भागात आज बुधवार दि.१० जुलै रोजी सकाळी ०७.१४/१५ वाजता जानवलेल्या भुकंपांच्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले असून या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. 

परभणी जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी रघुनाथ गावडे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या