🌟बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांविरोधात भाई विजय गवई यांचा एल्गार.....!


🌟अवैध व्यवसायाविरोधात विजय गवई आज दि.03 जुलैपासून चिखली पोलीस स्टेशन समोर करणार आमरण उपोषण🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

बुलढाणा/चिखली : पिपल्सं रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाढलेल्या अवैध व्यवसायाविरुध्दं एल्गार पुकारला या अवैध व्यवसायाविरोधात  विजय गवई दि 3 जुलैपासून चिखली पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणा त्यांनी आज दि 2 जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली.  यावेळी पिरिपा चे तालुकाध्यक्ष समाधान हिवाळे,रमेश आंभोरे उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेला संबोधीत करतांना भाई विजय गवई त्यांनी सांगितले की , शहरातील वाढलेल्या या अवैध धंदयाविरोधात  त्यांनी दि 21/06/2024 रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाला  निवेदन देऊन सात दिवसांमध्ये अवैध व्यवसायांविरोधात कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता  मात्र त्या निवेदनाची दखल घेण्यात न आल्याने 1 जुलै रोजी स्मरणपत्र देण्यात आले होते. मात्र त्याचीही दखल न घेतल्याने  3 जुलै पासून आमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याचे भाई विजय गवई म्हणाले.

यावेळी पुढे बोलताना भाई विजय गवई यांनी म्हटले की , चिखली पोलिस स्टेशन  हद्दीमध्ये दिवसेंदिवस अवैध व्यवसाय जोमात सुरु झालेले आहे. त्यात चिखली शहराच्या मधोमध असलेल्या आठवडी बाजारामध्ये मुस्लिम बांधवाच्या दर्गाजवळ क्लब एका बादशाह जुगार तसेच अवैध वरली मटका, व्हि. डी. ओ. गेम हे राजेरासपणे सुरु आहे. या ठिकाणी सामाजिक वातावरण बिघडून कायदा व सुव्यवस्था शकते, तसेच शहरात बस स्टॅण्ड परिसरामध्ये एक्का-बादशाह क्लब सुरु आहे असून याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे.

तसेच शहरातील नामाकिंत ले-आऊट मध्ये व्यायामशाळेमध्ये जुगार सुरु असून या सर्वांवर राजकीय व  पोलिस स्टेशनची मेहरबानी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. तसेच शहरात अवैध प्रवाशी वाहतूक पो.स्टे. च्या हद्दीमध्ये गावखेडयामध्ये अवैध दारु विक्री शहरात व परिसरामध्ये शहरातील वरली मटका व्यावसायीक यांचे नव्याने सुरु केलेला प्रतिबंधीत गुटखा खुलेआम शहरातील पान पट्टीवर मिळत असल्याने त्यांना कायदयाचा कोणताही धाक राहिल नसल्याचे ते म्हणाले.  या अवैध व्यवसायामुळे अनेकांचे संसार उद्धस्त होण्याची वेळ आली असून हे अवैध धंदे बंद व्हावे म्हणून उदया दि. 03 जुलै पासून मी भाई विजय गवई चिखली पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसणार  असल्याचे भाई विजय गवई यांनी या वेळी बोलताना सांगितले.....                                       

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या