🌟एसटी प्रवासी राजा दिवस : प्रवाशांच्या लेखी तक्रारीवर योग्य कार्यवाही.....!


🌟राज्यातील प्रत्येक आगार-डेपोमध्ये दर सोमवारी व शुक्रवारी एसटी प्रवासी राजा दिन आयोजित केला जाईल🌟

प्रवाशांना एसटी बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत असे वाटते. तसेच एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे. कमी केलेल्या बसफेऱ्या पुनश्च सुरू कराव्यात. प्रवाशी संख्या विचारात घेऊन ज्यादा बसफेऱ्या वाढवाव्यात. रस्ता तयार असलेल्या गावांसाठी नवीन बसफेऱ्या सुरू कराव्यात. "हात दाखवा, गाडी थांबवा" ही योजना पुन्हा नियमितपणे राबवली जावी, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाताहे. प्रवासी राजा दिनावर श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा मार्गदर्शक संकलित लेख प्रवाशांच्या सेवेशी सविनय सादर... संपादक.

       एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरणासाठी आता राज्यातील प्रत्येक आगार- डेपोमध्ये दर सोमवारी व शुक्रवारी एसटी प्रवासी राजा दिन आयोजित केला जाईल. त्यानुसार एसटीच्या विभाग नियंत्रकांना एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सुचना ऐकून घ्याव्या लागणार आहेत. "प्रवासी आपला आराध्य दैवत; तर परिवहन विभाग उपासक!" असेच काहीसे चित्र दिसेल. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्या भन्नाट संकल्पनेतून हा प्रयोग राबवला जाणार आहे. एसटी महामंडळाने या प्रकल्पानुसार प्रवाश्यांच्या समस्यांना गांभिर्याने घेत त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजनेसाठी हा उपक्रम राबवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल. ही अभिनव योजना दि.१५ जुलै २०२४पासून सुरू होणार आहे. शहरी व खेडूत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी-शिक्षक आपल्या समस्या-तक्रारी, सुचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडू शकतात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्या त्या वेळी जाहीर करतील. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्ररीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे. त्यावर योग्य कार्यवाही  तसेच तक्रारदारांचे समाधान करणारी योग्य उपाययोजना करणे संबंधीत कार्यालयास भाग पडणार आहे, असा विश्वास वाटतो. 

           एसटीच्या विविध बसेस मधून दररोज सुमारे ५४ ते ५५ लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना एसटी बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत असे वाटते. तसेच एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे. कमी केलेल्या बसफेऱ्या पुनश्च सुरू कराव्यात. प्रवाशी संख्या विचारात घेऊन ज्यादा बसफेऱ्या वाढवाव्यात. रस्ता तयार असलेल्या गावांसाठी नवीन बसफेऱ्या सुरू कराव्यात. "हात दाखवा, गाडी थांबवा" ही योजना पुन्हा नियमितपणे राबवली जावी, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाताहे. यासंबंधित प्रवाशी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते. प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे. अर्थात, प्रवाशांचे महत्तम समाधान हा उद्देश ठेऊन येत्या दि.१५ जुलै २०२४ पासून प्रवासी राजा दिन या अभिनव योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे आणि आपले एसटी बसवरील प्रेम, विश्वास, निष्ठा व गरज आजही काही कमी झाले नाही, हे सिद्ध करून दाखवावेच.

          प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य सोयीचे होणार आहे. अर्थात प्रवाशांचे महत्तम समाधान हा उद्देश ठेऊन येत्या सोमवार, दि.१५ जुलै २०२४पासून "एसटी प्रवासी राजा दिन" या अभिनव योजनेचे आयोजन करण्यात येणार आहे, ही एक अत्यंत  महत्वाची, आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे. आपण कधी कधी लांब पल्ल्याचा किंवा अपरिहार्य प्रवास अनिच्छेनेच करत असतो. यादरम्यान अनेकदा  प्रवाशांना एसटी संबंधित विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अस्वच्छ स्थानक, गलिच्छ प्रसाधनगृहे, वाहकांची अरेरावी, बंद पडणाऱ्या गाड्या, थांब्यावरील हॉटेलमध्ये महागडी सेवा या सार्वत्रिक तक्रारी आहेत. गाडी वेळेत न सुटणे किंवा ऐनवेळी रद्द होणे, गळक्या किंवा नादुरुस्त बसेस लावणे, हा अनुभवही वारंवार येतो. विशेषत: स्कुलबसेस व शिवशाहीबद्दल तक्रारी सर्वाधिक आहेत. या सर्व तक्रारी आता थेट विभाग नियंत्रकांसमोर मांडता येतील आणि सुखद, समाधानी सेवा निश्चितच मिळेल, अशी अपेक्षा करुया!

!! एसटी प्रवासी राजा दिन मोहिमेच्या  सर्व प्रवासी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!

                -- श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                रामनगर वॉर्ड, गडचिरोली, जि.गडचिरोली.

               फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या