🌟पुर्णा शहरातील पाण्याच्या प्रश्नावर शहरवासीय गंभीर : नगर परिषद प्रशासन मात्र निष्क्रिय कारभार चालवण्यात खंबीर ?


🌟महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली महिला व नागरीकांनी नगर परिषद कार्यालया समोर केले धरणे आंदोलन🌟


पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा शहरातील विविध नागरीवसाहतींसह निर्मनुष्य वसाहतींमध्ये देखील विकासाच्या नावावर नगर विकास मंत्रालय तसेच राज्यसभा/विधान परिषद सदस्य तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी मिळवून निकृष्ट व बोगस सिमेंट रस्ते/नाल्या,अनावश्यक गार्डन (पार्क), स्ट्रीट लाईटच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे शहरातील अनेक भागांत शेकडो लाईट अदृश्य पोल आदीं विकासकामांची मालिका आरंभणाऱ्या पुर्णा नगर परिषद प्रशासक तसेच मुख्याधिकारी युवराज पौळ यांना शहरातील आनंद नगर,अमृत नगर,राजे संभाजीनगर,आदर्श कॉलनी,तात्यासाहेब नगर, स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार कॉलेज परिसर आदी उच्चभ्रू वसाहतींमधील मागील दशक/दिडदशकांपून खितपत पडलेला पाण्याच्या गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यासाठी मात्र ना विकासनिधी उपलब्ध झाला ना तशी सद्बुद्धी सुचली असेच म्हणावे लागेल.


पुर्णा शहरातील आनंद नगर,अमृत नगर,राजे संभाजीनगर,आदर्श कॉलनी,तात्यासाहेब नगर, स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार कॉलेज परिसर आदी भागांतील पाण्याच्या गंभीर प्रश्नावर परिसरातील महिला व नागरिकांनी निष्क्रिय व निर्लज्ज नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के व शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०५ जुलै २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता नगरपरिषद इमारतीसमोर जोरदार धरणे आंदोलन केले यावेळी 'पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं' अशा घोषणा देत आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला परंतु निष्क्रिय नगर परिषद प्रशासनात कार्यरत मुख्याधिकारी पौळ यांच्यासह कोणत्याही जवाबदारी अधिकारी किंवा अधिकाऱ्याने दुपारी ०२.३० वाजेपर्यंत या धरणे आंदोलनाकडे ढुंकूनही बघितले नाही त्यामुळे आंदोलक महिलांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला निष्क्रिय नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर महिलांमधून प्रचंड नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत आहे.


 पुर्णा नगर परिषद इमारती समोर पाण्यासाठी धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलक महिलांचा प्रचंड रोष लक्षात घेऊन नाईलाजास्तव पूर्णा नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ व पाणी पुरवठा अभियंता किरण गुट्टे यांनी शेवटी आंदोलन करणाऱ्या महिला व नागरिकांची भेट घेऊन नेहमीच्या ठराविक पद्धतीने एका वर्षाच्या आत नवीन पाण्याची टाकी उभारून नळ कनेक्शन द्वारे कायमस्वरूपी पाणीपुरवठा करू व सध्या पाणीटंचाईवर सध्या उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नवीन पाईपलाईन करून संबंधित वसाहतींमध्ये एका महिन्यात नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू करू अशे आश्वासन देऊन सोपस्कार पुर्ण जरी केले असले तरी हे देखील लबाडाचे औतान ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित या आंदोलना वेळी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के,तालुकाध्यक्ष अनिल बुचाले,शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर,पंकज राठोड,ओम यादव,भरत बोबडे,अविनाश मैत्रे,पवन बोबडे यांच्यासह बायनाबाई वौध्य,रूक्‍मीनबाई टाक, कोंडाबाई चौकले, लक्ष्मीबाई कराळे, अंजली बाई गडवे, रूपाली धुळे, राधिका सूर्यवंशी, रेणुकाबाई कदम, सत्य कला पांचाळ, वर्षा ठाकूर, यमुनाबाई कदम, कौशल्याबाई सूर्यवंशी, ज्योती कीर्तनकार, फुलाबाई चौकाले, सरसबाईई भवरे, पूजा कुलकर्णी, प्रतिभा बेंडके, कूणता हेंडगे, जनाबाई कदम,कांताबाई कदम,दिव्या ठाकूर,शिवानी खाकरे, सरोजा चाकोते,मीना रुद्रावार,सुरेखामहिला रुद्रावार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.सदरील धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष गोविंद राज ठाकर व सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या