🌟वाशिम जिल्ह्यात आणी मंगरूळपीर तालुक्यात ठिकठिकाणी जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का...!


🌟जिल्ह्यात कोणतीही हानी झाली नाही🌟

फुलचंद भगत

वाशिम:-जिल्ह्यात तसेच मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार,धोञा,वरूड आदी ठिकाणी सकाळी ७-२० च्या सुमारास भुकंपाचा सौम्य धक्का जानवल्याचे नागरीकांनी सांगीतले,मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज पहाटे झालेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

                   राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दि.१०जुलैच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव,मंगरुळपीर,रिसोड, वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. याशिवाय हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.यासोबतच मराठवाडा परिसरात जमिनीतून गूढ आवाजही आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुका याला लागूनच अगदी खेटून आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे

                वाशिम जिल्ह्याच्या रिसोड,मंगरुळपीर,मालेगाव, वाशिम तालुक्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी दोन वेळा 3 ते 5 सेकंद हे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील पाचही तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे सकाळी 07:14 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंपाची नोंद झाली आहे.हिंगोलीमध्ये भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी संकेत स्थळावर देण्यात आली आहे.

* मराठवाड्यात जाणवले भूकंपाचे धक्के :-

मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा जिल्ह्यातील हिंगोली, परभणी व नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील व विदर्भातील झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पासून १३ किलोमिटर अंतरावर आहे.त्यामुळे लागूनच असलेल्या वाशीम,मंगरुळपीर व रिसोड तालुक्यात भूकंपाचा धक्का अनुभवायला मिळाला त्याची तिव्रता मालेगाव आणी मंगरुळपीर तालुक्यात कमी जाणवली आहे. भूकंपाचे केंद्र बिंदू पासून दूरदूर भूकंप लहरी क्षीण होत जातात हे त्या मागचे कारण माणल्या जाते.काही वर्षांपूर्वी झालेल्या किल्लारी तिव्र भूकंपाची अनेकांना आठवण झाली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या