🌟जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिन विशेष : गुरूजी प्लास्टिकचा वापर का करू नये ?


🌟सन २०१३ या वर्षी बॅग्स फ्री वर्ल्ड ऑर्गनायझेशन या संस्थेने आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्त दिन साजरा करायला सुरुवात केली🌟

प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, चमचे, ग्लास आणि प्लेट्स वापरून फेकून दिल्यावर ती वर्षानुवर्षे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा नदी आणि समुद्रात साचत राहतात. जमिनीच्या पोटात पाण्याचा निचरा नीट होत नाही, त्यामुळे भारतात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आहे. तरीही प्लास्टिकचा वापर अनेक प्रकारांत होतो. प्लास्टिकमुळे होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि लोकांना किमान त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी ३ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो. सन २००९ मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यास सुरुवात झाली.

         आपण आपल्या पातळीवर प्लास्टिकचा वापर कमी करून किंवा न करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावू शकतो. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी आम्ही कागदी किंवा कापडी पिशव्या वापरू शकतो. कागदाची पिशवी तयार करण्यासाठी कोणताही तपकिरी किंवा पांढरा जाड कागद घ्या. त्यावर सरळ रेषा काढा आणि फोल्ड करा. जेव्हा पिशवीचा आकार पूर्णपणे येतो तेव्हा शेवटी एक छिद्र करा आणि एक दोरी किंवा धागा बांधा. आमची बॅग तयार आहे. सन २००९ साली पश्चिम युरोपमध्ये प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी लावायला सुरु केले. यानंतर सन २०१३ या वर्षी बॅग्स फ्री वर्ल्ड ऑर्गनायझेशन या संस्थेने आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्त दिन साजरा करायला सुरुवात केली आणि हा दिवस जगभरात लोकप्रिय होत गेला. सन २०१५मध्ये युरोपियन युनियनने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी पहिले पाऊल उचलले. सन २०२२मध्ये सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणणारा बांगलादेश पहिला देश बनला. भारतामध्येही सिंगल यूज प्लास्टिक पिशवीवर बंदी आहे.

          प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी त्याचा कमीत कमी वापर करणे, खूप महत्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन या दिवशी प्लास्टिकबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी जगभरात संदेश दिले जातात. प्लास्टिकऐवजी दुसऱ्या पर्यायांच्या वापराबद्दल प्रेरित केले जावे, म्हणून आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस साजरा केला जातो. प्लॅस्टिक पिशव्या सहसा बॉक्स, कार्टन किंवा जार यांच्या तुलनेत कमी सामग्री वापरतात, त्यामुळे त्यांना कमी असलेले किंवा कमी केलेले पॅकेजिंग मानले जाते. आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस आहे. हा दिवस प्लास्टिकसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जाहीर करण्यात आला होता. परंतु आज वाढत्या प्रदूषणाबद्दल आपण किती जागरूक आहोत हा प्रश्न कायम उभा ठाकला आहे. आज देशातील अनेक शहरे प्लास्टिकच्या विळख्यात अडकली आहेत. प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक असून, आपण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्यांचा अनावश्यक वापर करून मानवी आरोग्याशी खेळले जात आहे. प्लास्टिकमुळे होणारे नुकसान, त्याचा वाढता वापर आणि दुष्परिणामांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी "आंतरराष्ट्रीय प्लॅस्टिक बॅग फ्री डे ३ जुलै २००९ पासून संपूर्ण जगात साजरा करण्यात येत आहे." आजही मोठ्या बाजारांपासून ते भाजी मार्केटपर्यंत वस्तू प्लास्टिकमध्ये उघडपणे विकल्या जात आहेत. दिवसेंदिवस समुद्रात वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे समुद्री प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

         भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२पर्यंत देशाला सिंगल युज प्लास्टिक मुक्त करण्याची घोषणा केली होती. सध्या संपूर्ण देशात सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास अडचणी येत आहेत. प्लास्टिक पिशव्यांवर घातलेल्या बंदीनंतर प्लास्टिकची अवैध वाहतूक आणि काळा बाजार या सारखे प्रकार समोर आले आहेत. "प्लास्टिकची पिशवी मागू नका!" अशी पाटी लिहिलेल्या दुकानातही दुकानदार पिशव्या ठेवतात. तर ग्राहकही त्यांच्याकडे पिशव्या मागतात. त्यामुळे प्लास्टिकचा वापर न करण्याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून सुरू करायला हवी. घराबाहेर पडताना पिशवी घेऊनच बाहेर पडावे. प्लास्टिकची पिशवी मागू नका. प्लास्टिक पिशवी दिली तरी तीला नाही म्हणाच! तरच प्लास्टिकचा वापर कमी होऊ शकेल आणि निसर्गाचे जतनही होऊ शकेल,  असे अपेक्षा करुया!

!! आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनाच्या सावधानीपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

                 - संकलन व सुलेखन -

                 श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                  पोटेगावरोड, गडचिरोली.

                  फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या