🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील 'आमदार आपल्या दारी' ऊपक्रमाला ऊत्फुर्त प्रतिसाद....!


🌟विविध शासकीय योजनांचे शासकीय अधिकार्‍यांच्या ऊपस्थीतीत भरले अर्ज🌟

🌟अधिकारी,पदाधिकारी आणी जनतेच्या समन्वयातुन ऊपक्रम यशस्वी🌟


फुलचंद भगत

वाशिम :- आमदार लखन मलिक यांच्या स्वयः प्रेरणेतुन मंगरुळपीर तालुक्यातील मौजे पारवा, बोरव्हा (बु. ), लख्मापूर येथे सर्व नागरिकांकरिता आज दि. 07 जुलै 2024 रोज रविवारला सकाळी ठीक 11.00 ते 05.00 वाजेपर्यंत आ.लखन मलिक यांच्या अध्यक्षते्खाली व तसेच तहसीलदार मंगरूळपीर यांच्या ऊपस्थीतीत शासकीय विविध योज़नेचे अर्ज भरुन 'आमदार आपल्या दारी' ऊपक्रमाच्या माध्यमातुन त्यांना लाभ मिळण्याचा मार्ग सुकर करण्यात आल्याने जनतेमध्ये कौतुक होत आहे.


         जनतेचे जीवनस्तर तसेच आर्थीक स्तर ऊंचावण्यासाठी शासनस्तरावरुन विविध कल्याणकारी योजना वेळोवेळी राबवल्या जातात.या योजनेच्या माध्यमातुन पाञ लाभार्थ्यांना मोठा आधार मिळतो.पण बहूतांश योजना लोकापर्यत पोहचत नाहीत किंवा यंञणांना पाञ लाभार्थ्यांचे कागदपञे घेवुन योजनेचा लाभ देण्याची यंञणा कधी कमी पडते त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची 'जञा' गावातच किंवा सर्कलमध्ये भरावी अशी अभिनव संकल्पना पारवा गटग्रामपंचायतने राबवण्याचा संकल्प केला.या अनुषंगाने मंगरुळपीर वाशिमचे आमदार लखन मलिक यांच्या हस्ते आणी तहसिलदार शितल बंडगर यांच्या ऊपस्थीतीत 'आमदार आपल्या दारी' ही संकल्पना मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथे राबविण्यात आली.या मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाचे तब्बल 250 लाभार्थी महिलांचे अर्ज भरण्यात आले.नवीन राशन कार्ड करणे,राशन कार्ड वेगळे करण्याकरिता,राशन नावे दुरुस्ती करणे,राशन कार्डची दुव्यम प्रत मिळवण्याकरिता 70 लोकांनी अर्ज केले.प्रधानमंत्री सन्मान निधी योजना

(मोदी योजनेचे 2000 हजार मिळण्या करिता)40 लाभार्थ्यांनी अर्ज भरलेत,संजय गांधी निराधार योजनाचेही 4 अर्ज प्राप्त झालेत.या ऊपक्रमाला जनतेचा ऊत्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन सर्व सबंधित विभागाचे अधिकारी आणी कर्मचार्‍यांनीही स्वतः ऊपस्थीत राहुन योजनांची माहीती लोकांना सांगुन त्यानुसार अर्ज भरुन घेतले.या कार्यक्रमाला आ.लखन मलिक,तहसिलदार शितल बंडगर,योगेश देशपांडे,जयस्वाल,सरपंच गोपाल लुंगे,ग्रामसचिव काळे,महिला बालकल्यान विभागाचे नितीन लुंगे,कृषी विभागाचे विस्तार अधिकारी अवगन,राशन विभागाचे तसेच संगायो विभागाचे कर्मचारी,अंगनवाडी सेविका,मदतनिस,भाजपाचे कार्यकर्ते आणी गावकर्‍यांची मोठ्या संख्येने ऊपस्थीती होती.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजता पदाधिकारी आणी पारवा गावचे सरपंच,ग्रामसेवक व गावकर्‍यांनी मोलाची भुमिका निभावली......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या