🌟विद्युत महावितरणचा गलथान कारभार पुर्णा तालुक्यातील गौर शिवारात तुटून पडलेल्या विद्यूत वाहिनीने घेतला म्हशीचा बळी....!


🌟पशुपालक बाळू दिवे यांचे जवळपास ०१ लाख २० हजार रुपयांचे नुकसान : महावितरणच्या दुर्लक्षामुळे घडली घटना🌟 

पुर्णा (दि.१० जुलै २०२४) - पुर्णा तालुक्यातील गौर शिवारातल्या सोनार नदीलगत मागील चार ते पाच दिवसांपासून तुटून पडलेल्या विद्यूत वाहिनीला चिपकून पशुपालक बाळू विश्वनाथ दिवडे यांच्या म्हशीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवार दि.१० जुलै २०२४ रोजी दुपारी १२.४० वाजेच्या सुमारास घडली या घटने संदर्भात चुडावा पोलीस स्थानकात रितसर तक्रार नोंद करण्यात आली असून चुडावा पोलिसांचे पथकाने तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन पंचनामा केल्याचे समजते.


या संदर्भात सविस्तर वृत्त असे की गौर शेत शिवारात पशुपालक बाळू विश्वनाथ दिवडे राहणार गौर हे नेहमी प्रमाणे आज बुधवार दि.१० जुलै २०२४ रोजी दुपारच्या सुमारास आपल्या म्हशी चारण्यासाठी घेऊन गेले होते यावेळी म्हशी चरता चरता परिसरातील सोनार नदीत गेल्याने या परिसरात मागील चार पाच दिवसांपासून तुटून पडलेल्या विद्यूत वाहिनीचा जोरदार शॉक लागून त्यांच्या एका म्हसीचा जागीच मृत्यू झाल्याने संबंधित गरीब पशुपालकाचे जवळपास ०१ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेस सर्वस्वी विद्यूत महावितरण कंपनीचा गलथान कारभार जवाबदार असल्याने संबंधित पशुपालकास महावितरण कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत असून विद्यूत महावितरण कंपनीने तात्काळ तुटून पडलेल्या विद्यूत प्रवाह वाहिनीची दुरुस्ती केली असती तर कदाचित ही घटना घडली नसती सदरील घटना घडल्यानंतर कुंभकर्णी झोपेतून जागे झाल्यागत विद्यूत महावितरण कंपनीने अधिकारी/कर्मचारी घटनास्थळी धावल्याचे समजते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या