🌟वाशिम जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यासाठी काळेपिथी लावून कामकाज.....!


🌟महसूल कर्मचारी यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तिव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येणार - जिल्हाध्यक्ष रवि महाले 

फुलचंद भगत

वाशिम :- महसूल कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यात बाबत सरकारतर्फे कुठलीही कार्यवाही किंवा  सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर वाशिम जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आज पासून दि 10 जूलै पासुन काळेपिती लावून कामकाज करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असून 15 जुलै रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी महाले यांनी दिला आहे.

                  या संदर्भात दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष यांनी राज्य शासनाला दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे उद्या दिनांक 11 जुलै रोजी जेवनाच्या सुट्टीत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात येणार असून 12 जुलै रोजी लेखनी बंद आंदोलन आणि 15 जुलै रोजी पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी महाले सचिव सचिन भारसाकळे कोषाध्यक्ष रवी अंभोरे यांचे सह जिल्हाधिकारी कार्यालयातील, व सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयातील सर्व महसूल कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून कामकाज केले आहे.

महसूल कर्मचारी यांच्या सदर मागण्या मान्य न झाल्यास तिव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रवि महाले यांनी दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या