🌟पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त भव्य लेप्रोस्कोपी शिबीर संपन्न.....!


🌟यावेळी शिबिरात ४२ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली🌟


पुर्णा (दि.११ जुलै २०२४) :- पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक लोकसंख्या दिना निमित्त आज गुरुवार दि.११ जुलै २०२४ रोजी भव्य लेप्रोस्कोपी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.


पुर्णा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विद्यासागर पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सर्जन डाॅ अशोक मुंढे यांच्या हस्ते व भुलतज्ञ डॉ.नितीन नरवाडे यांच्या उपस्थितीत भव्य लेप्रोस्कोपी (बिन टाका) शिबीर संपन्न झाले या शिबिरात ४२ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली या शिबिराचे नियोजन एरंडेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश गिनगिने यांनी नियोजन केले  होते या शिबिरासाठी डॉ.गजानन राऊत,डॉ.चव्हाण,डॉ .डाखुरे सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य सहाय्यक सहायीका, सर्व आरोग्य कर्मचारी,व परिचारिका आदी कर्मचाऱ्यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी महत्त्व पुर्ण कार्य केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या