🌟डॉ.दत्तात्रय वाघमारे कुटुंबायांनी पूर्णेकरांची विविध क्षेत्रात इमाने इतबारे सेवा केली - प्रकाश कांबळे


🌟डॉक्टर दिनाचे औचित्य साधून डॉ.वाघमारे यांच्या एक्यानवव्या वाढदिवसा निमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते म्हणाले🌟


 
पूर्णा : डॉ.दत्तात्रय वाघमारे यांनी आपल्या पूर्ण कुटुंबीयांसह पूर्णा शहरासह पूर्णा तालुक्यात सामाजिक,शैक्षणिक आणि आरोग्य सेवा इमाने इतबारे दिल्याच्या भावना रिपाईचे ज्येष्ठ नेते व संविधान गौरव समितीचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यांनी डॉक्टर दिनाचे औचित्य साधून डॉ.दत्तात्रय वाघमारे यांच्या एक्यानव व्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देताना व्यक्त केल्या.या प्रसंगी गौरव समिती च्या वतीने पूर्णा शहरातील प्रतिष्ठित हृदय रोग तज्ञ डॉ.विनय वाघमारे,स्त्री रोग तज्ञ डॉ.श्रद्धा वाघमारे,मुख तज्ञ डॉ गिरीश जैस्वाल, बालचंद थोरात,डॉ.शांताबाई वाघमारे,डॉ.संदीप जोंधळे,डॉ.गंगाधर कांबळे,डॉ.रमेश आकमार,डॉ.सुधीर जयस्वाल,डॉ.कपिल करवंदे(विभागीय सहाय्यक वैद्यकीय अधिकारी,रेल्वे) डॉ.नवीन कुमार.(रेल्वे) आदि मान्यवरांचा शाल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.

           प्रकाश कांबळे,पुढे म्हणाले,डॉ वाघमारे यांच्या कुटुंबियांच्या सेवेला पुर्णेत तोड नाही.त्यांनी पुर्नेत सामाजिक सेवे बरोबर शिक्षणाचा ध्यास घेवून विद्या प्रसारिनी सारखी मराठी माध्यमाची दहावी पर्यंत,आणि नेहरू इंग्रजी माध्यमाची शाळा ही काढून पूर्णेकराना शैक्षणिक सेवा दिली.तर वैद्यकीय क्षेत्रात आपला मुलगा आणि सुनेच्या माध्यमाने मोठी आरोग्य सेवा देण्याचे मोठे कार्य हे कुटुंब करीत आहे.आज ब्यानव्व्या वयातही डॉ.वाघमारे यांचे सेवा कार्यात बारकाईने लक्ष असते.

         संविधान गौरव समितीच्या वतीने डॉ. वाघमारे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शांताबाई वाघमारे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.या प्रसंगी रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे नेते अशोक कांबळे,श्यामराव जोगदंड,सय्यद रहीम,ज्ञानोबा जोंधळे,विजय जोंधळे,गौतम काळे,मोहन लोखंडे,त्रिंबक गोविंद कांबळे,शाहीर गौतम कांबळे,सुरेश खर्गखराटे आदी मान्यवरानी वाघमारे कुटुंबीयांचा सत्कार करून ऋण व्यक्त केले........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या