🌟हिंगोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज बुधवार दि.१० जुलै रोजी सकाळच्या सुमारास जाणवले भुकंपाचे धक्के.....!


🌟माहिती नुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक हाती आला आहे🌟

 हिंगोली : हिंगोली शहरासह हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून आज बुधवार दि.१० जुलै २०२४ रोजी सकाळी ०७.१४ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर ४.५ अशी नोंदविण्यात आलेली आहे.


हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात भुकंपाचा केंद्रबिंदू असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन हिंगोली जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र आज दि.१० जुलै रोजी सकाळी ०७.१५ दरम्यान भुगर्भातुन आवाज व सौम्य धक्का जाणवला आहे. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात ४.५ अशी झाली आहे. घेतलेल्या माहिती नुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचा प्राथमिक हाती आला आहे.....



जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त‌ माहिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या