🌟मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा......!

🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरचे उपविभागिय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सर्व सबंधित अधिकाऱ्यांना दिले निर्देश🌟


 
फुलचंद भगत

वाशिम:-मुख्यमंञी माझी लाडकी बहीण योजनेची जनजागृती करुन जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व सबंधीत यंञणांनी काम करावे तसेच ही योजना दलालमुक्त असावी यासाठीही सज्ज राहुन कुण्याही लाभार्थी महिलांची आर्थीक फसवणुक होवु नये यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश मंगरुळपीर येथील ऊपविभागिय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सर्व सबंधित अधिकाःर्‍यांना दिले आहेत.

              मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांचे आर्थिक स्वालंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. महिलाचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्या मुळे त्यांच्या आर्थिक स्वतंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वतंत्रयासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबुत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विविहीत विधवा,घटोस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिला अर्ज करु शकतात. सद्या अर्ज करण्यासाठी मोठया प्रमाणावर सेतु केंद्रावर व तहसिल कार्यालयामध्ये नागरीकांची गर्दी होत आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्या पर्यत योजना पोहचवणे आणि जास्तीत जास्त् लाभार्थ्याला लाभ देता येईल. असे आवाहन करण्यात आले.

*योजनेकरिता निकष :-

1. १. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि. १ जुलै, २०२४ ते ३१ ऑगष्ट २०२४ पर्यंत ठेवण्यात आली आहे. तसेच दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. ०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

2. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

3. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

4. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे.

5. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड त्या कुटुंबामध्ये उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही.

6. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

7. कोणत्याही कागदपत्रासाठी १०० रु स्टॅम्प ची आवश्यकता नाही त्या ऐवजी साध्या कागदपत्रावर हमीपत्र तयार करुन घ्यावे. ९ लाभार्थ्यांची अर्ज स्विकृती / तपासनी / पोर्टलवर अपलोड करणे अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / सेतु / ग्रामपंचायत /  ग्रामसेवक (ग्रामिण) अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / सेतु / वार्ड अधिकारी (शहरी) ईत्यादी कडे सादर करावा.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या