🌟पोलीस पाटील नामदेव कवळे यांना चारचाकी वाहनाने जबरदस्त धडक देऊन उडवल्याने त्यांचा मृत्यू.....!


🌟पोलिस पाटील कवळेंच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी🌟 


मलकापूर : मलकापूर तालुक्यातील मौजे कुंड (बू.) येथील पोलिस पाटील नामदेव तुकाराम कवळे हे दि.01 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील रस्त्यावरून डाव्या बाजूने पायीं चालत असताना मागुन येणाऱ्या एका चार चाकी वाहनाने जबरदस्त धडक देऊन उडवले आहे त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक 1 जुलै  2024 रोजी सकाळी ठीक 10 च्या दरम्यान घडली आहे चार चाकी वाहन क्रमांक 15- बिएएफ 2464 उडवल्या नंतर चार चाकी वाहनातून उतरून पाहणी केली व नंतर पोबारा केला या घटनेवरून असे असे संसयापद वाटते की यांनी जाणुन बुजुन कार चालकाच्या बे जबाबदारी गाडी चालवून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा केला आहे त्याची रितसर चौकशी करून साहेबांनी योग्य तो गुन्हा दाखल करुन पोलिस पाटील नामदेव कवळे यांना न्याय मिळवून द्यावा व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य मिळवून द्यावे योग्य तो न्याय मिळवून न दिल्यास सर्व पोलीस पाटील संघटना रस्त्यावर उतरल्या शीवाय राहणार नाहीत याची शासनाने दखल घ्यावी ही अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले

यावेळी सौ संगीता कचरे पोलीस पाटील दुसलगाव जिल्हा अध्यक्ष सौ गोदावरी शिंदे, उपाध्यक्ष सौ उर्मिला भैडेकर, पोलिस पाटील मायाताई शेळके, पोलिस पाटील सुवर्णा राठोड पोलिस पाटील आरती वाइनगडे पोलिस पाटील रेखा पुठ्ठेवाड पोलिस पाटील शितल कागंणे पोलिस पाटील अनुसया गहिरे , पोलिस पाटील वंदना राठोड इत्यादी पोलिस पाटील उपस्थित होते.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या