🌟 जंग-ए-अजित न्युज : महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.......!


🌟विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन उद्या मागे घेतले जाण्याची शक्यता🌟

✍️ मोहन चौकेकर

* सर्व भगिनींना विनंती करतो, एजंटच्या नादी लागू नका, लाडकी बहिण योजनेबाबत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व महिला भगिनींना आवाहन.

* उत्पन्नाची अट ते मुदतवाढ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल.

* लाडक्या बहि‍णींची झंझट मिटली, ना उत्पन्न दाखला, ना अधिवास प्रमाणपत्र ; राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणखी सोप्पी केली 

* मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, विधानपरिषद निवडणुकीतील चुरस वाढली ; ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांमुळे काँग्रेसचा उमेदवार धोक्यात पुन्हा घात होणार ? शिंदे गटाच्या आमदाराच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण 

* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावरील बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा ; नवाब मलिकांबाबतचा प्रश्न अजितदादांचे तीन शब्दात उत्तर, म्हणाले, त्रास होतोय का ? 

* आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना आरटीओ कार्यालयातून घ्यावं लागेल स्टीकर्स 

* विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे निलंबन मागे घेण्याची शक्यता.

* विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी  सभापती निलमताई गोऱ्हेंना दिले दिलगिरीचे पत्र.

* विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन उद्या मागे घेतले जाण्याची शक्यता.

* विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक.

* विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी लावले बॅनर ; संभाजीनगर जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी केला सरकारचा निषेध 

* अजित पवार माझे मित्र हे सरकार पुन्हा यावे मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला साकडे 

* तुकोबांच्या पालखीचा मार्ग बदलल्यामुळे ऊरळीकर संतापले, गावकऱ्यांनी पालखीची वाट अडवली ; विठ्ठलाचं नामस्मरण करत घेतला अखेरचा श्वास, आषाढी वारीत चालताना रामनाथ महाराज शिलापूरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 

* ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला ; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून ; 15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे, शिंदे गटाच्या सोलापूरच्या जिल्हाप्रमुखाची ठेकेदाराला धमकी खंडणीचा गुन्हा दाखल 

* उत्तर प्रदेशातील हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 116 वर, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू ;मृतदेहांचा खच, तडफडणारे जीव आणि जवळच्यांना गमावल्याचं दुःख; काळीज पिळवटून टाकणारे हाथरस दुर्घटनेचे फोटो

* जगज्जेता बनलेली टीम इंडिया बार्बाडोसवरुन रवाना ; उद्या पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदींची भेट घेणार

* ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार

* मराठा आरक्षण सुनावणी, राज्य मागासवर्ग आयोगाला हायकोर्टाची नोटीस, १० जुलैच्या सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश आयोगाला प्रतिवादी करण्यास विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांची माघार

* ६ जुलैला मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये महायुतीचा मेळावा, मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता.

* दूध उत्पादकांना प्रति लिटर ३० रुपये शिवाय पाच रुपये अनुदान असे ३५ रुपये शेतकऱ्यांना मिळणार, तर दूध भुकटी निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना किलोमागे ३० रुपये देणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. 

* दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार, कोणतेही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करुन देण्याचे शाळांना आदेश. 

* दिक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी.

 * महिलांकडून पैसे उकळणाऱ्या निलंबित तलाठी तुळशीराम कंठाळे विरोधात गुन्हा दाखल. वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

* छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण कार्यालयात उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, महाज्योती फेलोशिप मिळावी या मागणीसाठी गेल्या ३ दिवसांपासून विद्यार्थ्यांचं उपोषण सुरु.

* बीडच्या केकत सारणी गावात चार तरुणांचं शोले स्टाईल आमरण उपोषण, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची तरुणांची मागणी. 

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या