🌟परभणीत नालंदा ग्रंथालयाचा पायाभरणी समारंभ खा.फौजिया खान यांच्या उपस्थितीत संपन्न.....!


🌟ग्रंथालये ही समाजाचा आत्मा असतात - खासदार फौजिया खान   

परभणी (दि.०८ जुलै २०२४) : परभणीत खासदार फौजिया खान यांच्या स्थानिक विकास निधीतून साकार होत असलेल्या नालंदा ग्रंथालय आणि संशोधन केंद्राच्या पायाभरणी समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलतांना खा.फौजिया खान म्हणाल्या की ग्रंथालये ही समाजाचा आत्मा आणि आकांक्षा असतात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनिअर शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नरवाडे होते. मंचावर तहसीन अहमद खान, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्‍वंभर गावडे, धम्म ज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिताताई वाव्हळे, भीम जयंती समितीचे सेक्रेटरी विशाल शिंदे, प्रा. डॉ. अरुणकुमार लेमाडे, नालंदा परिवारातील ज्येष्ठ सदस्य प्रा. पी. एम. जोगदंड यांची उपस्थिती होती.

             पुढे बोलतांना डॉ खान म्हणाल्या, समताधिष्ठित भारत निर्माणासाठी संविधान हे एकमेव साधन असून भारतातील जनतेने ते दाखवून दिले याचा अभिमान वाटतो, असे नमूद करीत नालंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ग्रंथालयाबरोबरच संशोधन केंद्र बनत आहे याचा अभिमान वाटत असून येणार्‍या काळात ‘नालंदा’द्वारे पुरोगामी विचाराचे विद्यार्थी घडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच नालंदा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष करण गायकवाड यांच्यासह संपूर्ण टीमला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी नालंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व डॉ.फौजिया खान यांच्या हस्ते ‘नालंदा’चे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रा. डॉ. अरुणकुमार लेमाडे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सेक्रेटरी इंजि. भीमप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन सह कोषाध्यक्ष भा. ना. इंगळे यांनी केले तर आभार सहसचिव अण्णासाहेब जल्हारे यांनी मानले. नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट, धम्म ज्योती महिला मंडळ आणि भीम जयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रविराज पार्क पार्वतीनगर मधील धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नालंदा विपश्यना केंद्राचे कार्याध्यक्ष बी. आर. आव्हाड, तांत्रिक सल्लागार गोपीनाथ खंदारे, संघटक सुदाम इंगोले, उपाध्यक्ष आर. एन. मस्के व यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या