🌟परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या अचूक माहितीसाठी दामिनी ॲप वापरा....!

 


 🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे शेतकरी बांधवांना आवाहन🌟 

परभणी (दि.01 जुलै 2024) : मान्सून कालावधीत विशेषतः जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात विज पडून जीवित वा वित्त हानी होत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. विज पडून जीवित हानी होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांनी 'दामिनी' अॅप तयार केले आहे. ते Google Play Store वर उपलब्ध आहे.  शेतक-यांनी नैर्गिक आपत्तीची माहिती मिळविण्यासाठी हे अॅप  डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. 

या ॲपबाबत जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना विविध माध्यमातून सूचित केले जाते. हे ॲप GPS लोकेशनच्या आधारे काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. आपल्या सभोवतील परिसरात विज पडत असल्यास त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतच्या सुचना अॅपद्वारे वापरकर्त्यांना दिल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी दामिनी ॲप  Play Store मधून डाऊनलोड करावे तसेच इतरांनाही वापरण्याबाबत प्रवृत्त करावे.

तथापी, दि. 30 जून रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील, लोणावळा येथील भुशी धरण येथे वर्षा विहार (जल पर्यटन) करिता गेलेल्या एकाच कुटुंबातील 05 व्यक्ती वाहून गेल्याची दुख:द घटना घडली आहे. त्याअनुषंगाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी, पुर्णा, दुधना व करपरा या प्रमुख नद्यावरील येलदरी व निम्न दुधना हे धरणे तर ढालेगाव, तारुगव्हान, मुदगल, दिग्रस, उच्च पातळी बंधारे आणि झरी, करपरा, मासोळी, मुळी व पिंपळदरी हे मध्यम प्रकल्प हे प्रमुख जलाशय असून त्यामधून वेळोवेळी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असतो. या  ठिकाणी जिल्ह्यातील नागरिक / पर्यटक वर्षा विहार (जल पर्यटन) साठी जात असतात अशा ठिकणी पुणे जिल्ह्यातील अपघाताप्रमाणे अनुचित घटना / अपघात घडू नये यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच अशा ठिकाणी साथीचे रोग पसरण्याची ही शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे..........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या